Fri, Apr 19, 2019 08:35होमपेज › Konkan › जिल्ह्याच्या जीएसटी संकलनात 13 टक्के वाढ

जिल्ह्याच्या जीएसटी संकलनात 13 टक्के वाढ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


रत्नागिरी : प्रतिनिधी

जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर कायदा लागू झाल्यानंतर आर्थिक वर्षाअखेर रत्नागिरी जिह्याच्या कर संकलनात सुमारे 13 टक्क्यांपर्यंत जादा संकलन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त करण्यात आला तर केंद्रीय कर विभागाच्या नोंदीत करदाता संख्येत साडेतीन हजारांवरून 8 हजारपर्यंत वाढ झाली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

वस्तू व सेवा कर कायदा लागू झाल्यानंतर आर्थिक वर्षाअखेर  या कायद्याच्या अंतर्गत 20 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योगांना नोंदणी करणे अपरिहार्य ठरल़े  यापूर्वी केंद्रीय कर असलेल्या सेवा कर व उत्पादन शुल्क विभागाकडे रत्नागिरी जिल्ह्यातील साडेतीन हजार उद्योजक नोंदणीकृत होत़े त्यांची संख्या 8 हजारांपर्यंत वाढली आहे.राज्य व केंद्र सरकारच्या वस्तू व सेवा कराचे रत्नागिरी नोेंदणीकृत विक्रेत्यांची संख्या सुमारे 11 हजारांपर्यंत पाहोचली आह़े  यातील  50 टक्के उद्योजक राज्य कराखाली तर 50 टक्के केंद्र कराखाली नोंदणीकृत आहेत. केंद्रीय करदात्या संख्येत 87 टक्के वाढ आर्थिक वर्षाअखेर झाल्याचे पुढे आले आहे. 

जीएसटी कायद्याप्रमाणे प्रत्येक राज्यात एक या प्रमाणे सेंट्रल प्लेस ऑफ बिझनेस म्हणून एकेका ठिकाणाची नोंद करणे प्रत्येक उद्योजकाला आवश्यक ठरत़े त्या ठिकाणाहून राज्यातील सर्व उलाढालीवर कर भरला जाऊ शकतो. राज्यातील अन्य ठिकाणच्या उलाढालीसाठी एकाच केंद्राद्वारे कर भरून चालतो. या तरतुदीचा लाभ कोकणातील कर भरणार्‍या कंपन्यानी घेतला आहे.काही कंपन्या रत्नागिरीत कार्यरत असल्या तरी त्यांचे नियंत्रण कार्यालय मुंबईसारख्या ठिकाणी असल्याने त्यांचा कर भरणा मुंबईतील ठिकाणी केला जातो. मात्र, त्याची नोंद जिल्ह्याच्या करप्रणालीत होत असल्याने जीएसटीच्या भरण्यात वाढ झाल्यचे निदर्शनास आले आहे. जीएसटीमुळे किंमत वाढ होण्याचे कोणतेही  कारण नाही. तसे झाल्यास लेखी तक्रार ग्राहकांनी करावी, असे आवाहन जिल्हा वस्तू सेवा कर कार्यालयातर्फे करण्यात आले आह़ेकोणत्याही उद्योजकाला जीएसटीविषयी प्रश्‍न असेल तर त्यांनी केंद्र, राज्य जीएसटी विभागाच्या कार्यालयातील मदत कक्षात संपर्क साधावा, व्यावसायिकांच्या सर्व अडचणी दूर केल्या जातील, असे आवाहन कार्यालयाने केले आहे.

Tags : Konkan, Konkan News, GST, compilation, district, increased, 13 percent, Goods and Service Tax


  •