Sun, Jan 19, 2020 22:17होमपेज › Konkan › रत्नागिरीत मांडवी समुद्रकिनारी अनोळखी तरुणाचा मृतदेह 

रत्नागिरीत मांडवी समुद्रकिनारी अनोळखी तरुणाचा मृतदेह 

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 10:58PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शहरातील मांडवी समुद्रकिनारी सोमवारी सकाळी 6 वा. सुमारास अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत नितीन जगन्‍नाथ तळेकर (वय 54, रा. वरचीवाडी मांडवी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना खबर दिली. 

तळेकर सोमवारी सकाळी नितीन तळेकर मांडवी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना समुद्रकिनारी एका अज्ञात  अंदाजे  वय 35 वर्षे तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट असून काळ्या रंगाची टॅ्रक पॅन्ट आहे. परंतु, मृतदेहाचा चेहरा माशांनी खाल्ल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे. समुद्रकिनारी अनोळखी मृतदेह सापडल्याचे समजताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून उतरीय तपासणीसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत. दरम्यान, रविवारी अज्ञात तरूणाचा मजगाव येथील चिरेखाणीत मृतदेह आढळला होता. सोमवारी मांडवी येथे अन्य एकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात चर्चा रंगल्या आहेत.