Wed, Jul 17, 2019 10:19होमपेज › Konkan › आंबेरीत पाचवे बालसाहित्य संमेलन २५ डिसेंबरला

आंबेरीत पाचवे बालसाहित्य संमेलन २५ डिसेंबरला

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 8:58PM

बुकमार्क करा

कुडाळ : शहर वार्ताहर

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने, बालसाहित्य  चळवळीला गतिमान करण्यासाठी गेली चार  वर्षे कुडाळ येथे बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते.  एक दिवशीय या बालसाहित्य संमेलनाला जिल्हाभरातील बालसाहित्यिक  मित्रांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. म्हणूनच कोमसापने पाचवे बाल साहित्य संमेलन डि.डि. देसाई बाल  साहित्य संमेलन म्हणून डि.डि. पॉईंट आंबेरी तालुका कुडाळ येथे  25 डिसेंबरला आयोजित केले आहे. 

एक दिवशीय या बालसाहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, परिसंवाद, बालकविसंमेलन, बालसाहित्य प्रकारात, पाठ्यपुस्तकातील लेखकाची मुलाखत व निवडक सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. एका बालसाहित्यिकाची निवड  बालसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी करण्यात येणार असून बालकविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी बालकवीच  राहणार आहेत. पूर्णपणे छोट्या बालसाहित्यिक मित्रांचे संयोजन राहणार असून या बालसाहित्यिक संमेलनाला कोमसापचे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक  पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, केंद्रीय अध्यक्ष साहित्यिक महेश केळुसकर व सिंधुदुर्गातील बुजूर्ग कवी, साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.

विशेष करून या बालसाहित्य संमेलनास माणगाव हायस्कुल, वाडोस हायस्कुल, हळदीचे नेरूर हायस्कूल,यक्षिणी माध्यमिक विद्यालय,वसोली हायस्कुल व कुडाळ,सावंतवाडी या तालुक्यातील शाळा सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांना विनंती आहे.आपल्या शाळेतील बालकवींची नोंदणी करावी. पाचव्या बालसाहित्य संमेलनासाठी उपाध्यक्ष रणजित देसाई, अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित राहणार आहेत.

बालसाहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी मंगेश मसके, एस.टी. आवटे, अरूण मर्गज, आनंद वैद्य, विठ्ठल कदम, भरत गावडे, विजय पालकर, वृंदा कांबळी, उषा परब, किशोर वालावलकर, मनोहर परब, रूजारिओ पिंटो, खांबकर गुरूजी, चंद्रकांत सावंत,  कांबळे सर, उदय सरपे, साटम सर,  देवरूखकर, धोंड,  देवदत्त परूळेकर, वैशाली पंडित, मधुसूदन नानिवडेकर, संजीव राऊत,  संतोष टक्के  आदींची संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.