Wed, Nov 14, 2018 01:38होमपेज › Konkan › कुडाळमध्ये दहा जुगारींना अटक 

कुडाळमध्ये दहा जुगारींना अटक 

Published On: Apr 29 2018 11:53PM | Last Updated: Apr 29 2018 10:58PMकुडाळ : वार्ताहर

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने माणगाव येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर आकस्मिक छापा टाकून जुगार खेळणार्‍या दहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोटारसायकल व रोख रकमेसह 1 लाख 7 हजार 720 रु.चा मुद्देमालही जप्‍त केला. ही कारवाई शनिवारी रात्री 11 वा.च्या सुमारास करण्यात आली.

माणगाव बाजारपेठेतील लक्ष्मी बेकरी परिसरात जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. यानुसार शनिवारी रात्री उशिरा या विभागाच्या पथकाने वरील ठिकाणी अचानक छापा टाकला. त्यावेळी तेथे ‘अंदर-बाहर’ नावाचा जुगार सुरू असल्याचे दिसून आले. 

या पथकाने तत्काळ कारवाई करत जुगार खेळणारे विनायक कुडतरकर, उमेश सखाराम भिसे, सुधीर केशव तामाणेकर, अशोक वामन हळदणकर, सुनील वामन हळदणकर, विष्णू बाबुराव सुतार, सुभाष सावंत, काशिनाथ सुरेश घोगळे, गंगाराम म्हाडगुत, तुकाराम रामचंद्र धुरी यांना अटक केली. यानंतर त्यांना कारवाईबाबत नोटिसा बजावण्यात आल्या. घटनास्थळी दोन मोटारसायकल, एक मोबाईल व काही रोकड असा ऐवज सापडून आला. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला. याची अंदाजे किंमत 1 लाख 7 हजार 726 रू. असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या बाबतची नोंद कुडाळ पोलिस स्थानकात झाली आहे.