Thu, Dec 12, 2019 09:15होमपेज › Konkan › नांदगाव येथे टेम्पो, ओमनीची धडक 

नांदगाव येथे टेम्पो, ओमनीची धडक 

Published On: Oct 29 2018 12:51AM | Last Updated: Oct 28 2018 10:05PMनांदगाव : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावर ओटव फाटा नजीक टेम्पो व मारूती ओमणी कारमध्ये झालेल्या अपघातात ओमनी चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी रात्री 11.30 वा. च्या दरम्यान घडला.

ओमनी चालक सचिन शशिकांत सावंत (24, रा.बावशी) हे कणकवलीवरून आपल्या घरी बावशी येथे जात होते. मुंबई-गोवा महामार्गावर ओटव फाटा येथे आले असता वेंगुर्लेकडे जाणारा मालवाहू टेम्पोंची त्यांचा ओमीनीला धडक बसली. या अपघाताची भीषणता एवढी होती की, ओमनी चालक सचिन सावंत याचे दोनही पाय जायबंदी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी कणकवली येथे खासगी रुग्णालयात दाखल केले.