Sun, Apr 21, 2019 14:07होमपेज › Konkan › शिक्षकांच्या बदल्यांना सापडला मुहूर्त

शिक्षकांच्या बदल्यांना सापडला मुहूर्त

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 12 2018 10:06PM

बुकमार्क करा
रत्नागिरी :प्रतिनिधी

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत दि. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्‍चित झालेले आहे. या धोरणानुसार संगणकीय पद्धतीने या वर्षीची बदली प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शिक्षकांचे शाळानिहाय मॅपिंग होणे आवश्यक आहे. 

सध्या जिल्हा परिषद शाळांची संच मान्यता अंतिम करण्याची कार्यवाही चालू आहे. शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांना ‘सरल’ प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने संच मान्यता पूर्ण करण्यासाठी शाळेची व विद्यार्थ्यांची माहिती शाळा व केंद्रप्रमुख लॉगीनमधून फॉरवर्ड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. १६ जानेवारीपासून लगेचच जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही मुदतीत व नियोजनबद्ध होणे गरजेचे आहे. यासंबंधीच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच समायोजनाची प्रक्रिया कोणत्याही

परिस्थितीत दि. १५ जानेवारी २०१८ पूर्वी करण्याची दक्षता घ्यावी, असे शासनाचे पत्र जिल्हा परिषदेला आलेले आहे.  बदलीसाठी संवर्गनिहाय फॉर्म पुन्हा भरून घेतले जाणार आहेत. जिल्हांगर्तत बदली प्रक्रियेत गेल्यावेळी झालेल्या चुका लक्षात घेऊन शासनाने यावेळी जानेवारी महिन्यापासूनच प्रक्रिया सुरू केली आहे. मे महिन्यात बदलीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे संकेत मिळत आहेत. यामुळे जिल्हा बदली करणार्‍या शिक्षकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.