Tue, Mar 19, 2019 15:58होमपेज › Konkan › मुलांना सुरक्षेचे प्रशिक्षण द्या : यादव

मुलांना सुरक्षेचे प्रशिक्षण द्या : यादव

Published On: Mar 12 2018 10:54PM | Last Updated: Mar 12 2018 9:15PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आपली मुले-मुली सोशल मीडियाचा भरपूर वापर करतात. त्यांना स्वतःची सुरक्षा करण्याचे प्रशिक्षण द्या. आजच्या युगात ते महत्त्वाचे आहे. आपले मूल नेमके काय करते, यावरही बारीक लक्ष ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा महिला विशेष सुरक्षा कक्षाच्या पोलिस उपनिरीक्षक व दामिनी पथकाच्या प्रमुख स्वाती यादव यांनी केले रत्नागिरी- जागतिक महिला दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभागीय केंद्र व फिनोलेक्स उद्योग समूहातर्फे महिला बचत गट व उद्योगिनींनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा महिला विशेष सुरक्षा कक्षाच्या पोलिस उपनिरीक्षक व दामिनी पथकाच्या प्रमुख स्वाती यादव यांनी केले. साई मंगल कार्यालयात प्रदर्शन सुरू आहे. यामध्ये 35 स्टॉल्स मांडण्यात आले आहेत.

यावेळी स्वाती यादव म्हणाल्या की, कोणत्याही व्यवसायात कमीपणा मानू नका. महिला आता चूल-मूल या परिघातून बाहेर पडून सर्व क्षेत्रात भरारी मारत आहेत. 
गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ व शोभिवंत वस्तू उत्तम प्रकारे तयार करणार्‍या येथील महिला उद्योजिकांनीही रत्नागिरीचा ब्रँड तयार करावा. मी महिला सुरक्षा कक्षात कार्यरत आहे. महिलांनी आपल्या कोणत्याही अडचणी येथे येऊन मांडाव्यात. अनेक विस्कटलेले संसार आम्ही जोडले आहेत.

यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, उपाध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर, जिल्हा सदस्य विवेक सावंत, अविनाश काळे, प्राची शिंदे उपस्थित होत्या. सौ. मनाली राणे यांनी सूत्रसंचालन केले.
गृहोपयोगी वस्तू, महिलांची डोळे व कान तपासणी, फनी गेम्स, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ यावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. प्रदर्शन 12 मार्चपर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 11 मार्चला सकाळी 11.30 वाजता डॉ. कांबळे दंत चिकित्सा व मार्गदर्शन करतील. दुपारी 2 वाजता पोह्यांपासून विविध पदार्थ बनवण्याची पाककला स्पर्धा, 3 वाजता मधुमेहावर डॉ. पल्लवी गद्रे मार्गदर्शन करतील, 4.15 वाजता पोह्यांचे विविध प्रकार यावर प्रशिक्षण होणार आहे. 12 मार्चला सायंकाळी 5 वाजता सर्व स्पर्धांचा बक्षीस समारंभ होईल. यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त व्याख्यान व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.