Thu, Apr 25, 2019 03:37होमपेज › Konkan › सावंतवाडीत स्वाभिमान पक्षाचाच उमेदवार असेल : नारायण राणे

सावंतवाडीत स्वाभिमान पक्षाचाच उमेदवार असेल : नारायण राणे

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 10:22PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची आपली उमेदवारी कन्फर्म झाली आता दादा मला पाठिंबा देतील अशा आशेवर आपल्यातूनच गेलेला एक आहे मात्र असे अजिबात होणार नाही. नारायण राणेंनी एकदा एका एखाद्याकडे एखाद्या नजरेने बघितले की ती नजर पुन्हा कधीच बदलत नाही.  हवा तेवढा प्रयत्न कर,  पाहिजे तेवढे पैसे खर्च कर,  पण  सावंतवाडीमध्ये स्वाभिमान पक्षाचा उमेदवार असेल लक्षात ठेव, असा इशारा राजन तेली यांना त्यांचे नाव न घेता स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी दिला. याच वेळी माझी माझ्या पक्षातच ताकद असते असे नाही तर तिथेही पक्षात असते हे लक्षात ठेव, हवे तर प्रमोद जठार यांना विचार असा  टोलाही राणे यांनी लगावला.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ सोमवारी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनच्या सभागृहात पक्षाध्यक्ष नारायण राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच श्रीफळ वाढवून करण्यात आला. सौ. नीलम राणे,  पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, उपाध्यक्ष अशोक सावंत, प्रमोद कामत, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नासिर काझी, गोट्या सावंत, मनीष दळवी, संजू परब,  डॉ मिलिंद कुलकर्णी, सुदन बांदिवडेकर यांसह हजारोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

सभासद नोंदणी शुभारंभानंतर बोलताना नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना सभासद नोंदणी करण्याचे आवाहन करतानाच शिवसेना पालकमंत्री, खासदार आणि आ. वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका केली. राणे यांनी महाराष्ट्र आणि देशभरात आपण जे काम करतो ते काम सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांच्या पाठबळावर करत असल्याचे सांगत या पक्षाला मोठे करण्याची ताकद सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्यांनी ती केली पाहिजे यासाठी उद्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जावे लागले तरी आपण गेले पाहिजे.  

शिवसेनेने कोकण आणि मुंबईसाठी काही केले नाही असे स्पष्ट करताना काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांचा समाचार घेतला. 5 रूपये शुल्क घेवून सभासद नोंदणी करण्यात आली.सभासद नोंदणी कार्यक्रमाला बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी, नारायण राणे यांचे कॅपिटल म्हणजे त्यांचा ‘चांगला कार्यकर्ता’ आहे. जिल्ह्यात सध्या 70 टक्के ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा झेंडा आहे. जिल्ह्यात 913 बूथ आहेत. या प्रत्येक बुथवरील पदाधिकारी यांनी पाच-पाच सभासद केल्यास एका दिवसात एक लाख सभासद होवू शकतील, असा विश्‍वास व्यक्‍त केला. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी बोलताना कोणत्याही पक्षाची मालमत्ता म्हणजे सभासद नोंदणी. सभासद हीच बॅलनशीट व कॅपिटल असते. लोकसभा व तिन्ही आमदार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असतील.  जिल्हा अनेक वर्षे विकासात मागे गेलेला आहे. जिल्हा नियोजन बैठक सात-आठ महिने होवू शकत नाही, असे सांगितले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संदीप कुडतरकर यांनीही आपले विचार व्यक्‍त केले. माणगाव हुमरस येथील शिवसैनिकांनी यावेळी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.

विमान उडविण्याचे काम सुरेश प्रभू, नारायण राणे बघतील

सद्यस्थितीत महाराष्ट्रात असलेल्या काँग्रेस पक्ष शिवसेना राष्ट्रवादी भाजप आधी कोणताच पक्ष जनतेच्या भल्याचं आणि समाजाचे काम करू शकत नाही. त्यांच्या मर्यादा लक्षात आल्यानेच आपण स्वाभिमानी पक्षाला जन्म दिला. पालकमंत्र्यांवर टीका करताना 12 सप्टेंबरला विमान उडणार आहे म्हणे कसली उडवणार कागदाची उडववणार का? अशी खिल्ली उडवत विमान उडवणे हे काम तुमचे नाही, तुमच्या आवाक्यातील तो विषय नाही, विमान उडविण्याचे काम सुरेश प्रभू आणि नारायण राणे बघतील, असेही ते म्हणाले.