Fri, Jan 24, 2020 21:42होमपेज › Konkan › ...तर लोकांना राणेंकडे का यावे लागते

...तर लोकांना राणेंकडे का यावे लागते

Published On: Jan 15 2019 1:26AM | Last Updated: Jan 15 2019 12:22AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

आम्ही गावागावात विकास केला असे म्हणता तर नागरिकांना राणेंकडे का यावे लागते ? वाटदच्या सभेची दखल घेत नाही म्हणता मग शिवसेनेला आपली ताकद दाखवण्यासाठी सभा का घ्यावी लागली, असा प्रश्‍न स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

वरवडेचा पाणी प्रश्‍न राणेंनी झटक्यात सोडवला. मात्र, पंचायत समितीच्या अधिकार्‍यांना आमदारांनी दुसर्‍या दिवशी बोलावून घेऊन थांबवून ठेवले, म्हणून एक दिवस उशिराने पाणी सुरु झाले. आमदार येथील कुटुंबप्रमुख पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य अगदी अध्यक्षाही शिवसेनेच्या मग कुटुंबप्रमुख म्हणून का लक्ष घातले नाही. पाण्यासाठी आठ दिवस नागरिकांना का वणवण करावी लागली. प्रश्‍न सुटत नाहीत, म्हणून लोकांना राणेंकडे यावे लागत आहे.

आमच्याही सभेला स्थानिकचे होते. फक्‍त जिल्हा कार्यकारिणी सदस्य जिल्हाभरातून आले होते. याठिकाणी मोठ्या संख्येने वाटद जि.प. गटातील विविध गावातील ग्रामस्थांनी प्रवेश केला म्हणूनच आता काहीबाही बरळत आहेत.

आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर जाल तर घरात घुसून मारु असे आम्ही सांगितले व यापुढेही सांगू. सामान्य जनतेला छळलात तर गप्प बसणार नाही असा इशाराही नागरेकर यांनी दिला. मुळात रत्नागिरी शिवसेना संपवण्याचा विडाच आमदार खासदारांनी उचलला असल्याचे सांगतानाच आमदारांना कणकवलीत जाण्याची आवश्यकता नाही. स्वाभिमानचे कार्यकर्तेच पालीत येतील असेही नागरेकर यांनी सांगितले.

यावेळी विकास पाटील म्हणाले की, ज्यांनी वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आमदार बनवले त्या शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूपसत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मेळाव्यातही बचत गटाच्या साडेसातशे महिलांना बोलावण्यात आल्याचे सांगितले.नारायण राणे यांनी क्षमता सिध्द केल्यानेच आपली कारकिर्द घडवली. खासदारांवर बाळासाहेबांनी का विश्‍वास दाखवला नाही, असा प्रश्‍नही विकास पाटील यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात स्वाभिमान पक्ष शांततेतच निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.