Tue, Apr 23, 2019 21:40होमपेज › Konkan › बांद्यातील वीज समस्यांबाबत‘स्वाभिमान’ चे कार्यकर्ते आक्रमक

बांद्यातील वीज समस्यांबाबत‘स्वाभिमान’ चे कार्यकर्ते आक्रमक

Published On: Apr 23 2018 11:12PM | Last Updated: Apr 23 2018 10:44PMसावंतवाडी : शहर वार्ताहर
बांदा शहरात गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या विजेच्या लपंडावावरून आक्रमक झालेल्या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बांदा येथील महावितरणचे सहायक अभियंता श्री. आपटेकर यांना सोमवारी घेराव घातला.

बांदा शहरात गेले काही दिवस विजेचा लपंडाव सुरू असून जीर्ण पोल व खराब झालेल्या वीज वाहिन्यांमुळे बांदा शहराची बत्ती वारंवार गुल होत आहे. ऐन उन्हाळ्यात तसेच आठवडा बाजाराच्या दिवशी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरात उद्भवणार्‍या विजेच्या समस्येबाबत महावितरणकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आली नव्हती. यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी महावितरणाच्या अधिकार्‍यांना घेराव घालत जाब विचारला. येत्या दहा दिवसांत बांदा शहरातील वीज वितरणाची सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. त्याचप्रमाणे तातडीने पाच पोल बदलून देण्यात येतील, असे असे आश्‍वासन वितरणचे सहायक अभियंता आपटेकर यांनी दिले. 

 दरम्यान, बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनीही आपटेकर यांची भेट घेऊन बांदा शहरातील विजेची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.  स्वाभिमान पक्षाचे बांदा शहर अध्यक्ष जावेद खतीब, उपसरपंच अक्रम खान, गुरू सावंत, ज्ञानेश्‍वर सावंत, साई धारगळकर, सागर सावंत, मंदार धामापूरकर, उमेश येडवे, दीपक सावंत, अनिल पावसकर, शाम मांजरेकर, अवि पंडित, हेमंत दाभोलकर, गौरांग शेर्लेकर उपस्थित होते.