Wed, Mar 27, 2019 03:57होमपेज › Konkan › ‘प्रधानमंत्री आवास’च्या लाभासाठी मोबाईल अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण

‘प्रधानमंत्री आवास’च्या लाभासाठी मोबाईल अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 8:31PMओरोस : प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी शासनाने ठरविले मात्र यामध्ये अनेक कुटुंबांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. शासनाने अशा कुटुंबाकडून पुन्हा अर्ज भरून घेतले आहेत.योजनेच्या लाभासाठी आता या कुटुंबाची मोबाईल अ‍ॅपद्वारे छाननी केली जाणार आहे. त्यासाठी तेरा निकषात बसणारी कुटुंबेच प्रधानमंत्री आवास योजनांसाठी पात्र ठरणार आहेत. 

प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे घर असावे या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही योजना अंजेड्यावर घेतली असल्याने अंमलबजावणीला प्राधान्य दिले जात आहे. आर्थिक व जातनिहाय जणगणनेनुसार प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी निवडले आहेत. मात्र, पात्र असूनही डावलल्याचा अनेक कुटुंबांनी आक्षेप नोंदविला. त्यामुळे अशा कुटुंबांकडून ड नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले.पहिल्या टप्प्यात घराच्या निकषाची तपासणी करण्यात आली आता दुसर्‍या टप्प्यात या कुटुंबाची तेरा निकषानुसार ग्रामसेवकामार्फत छाननी होणार आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारे होणार्‍या या छाननीसाठी सरकारतर्फे टॅब पुरविले जाणार आहेत. मात्र, त्याचा गण वगळून गावाची त्याच्यावर जबाबदारी दिली आहे. त्याच्यासोबत संबंधित गावातील ऑपरेटर दिला जाणार आहे. प्रत्येक घरामागे 20 रू. मानधन या ऑपरेटरना दिले जाणार आहे. 15 ऑगस्टला आलेल्या अर्जाची छाननी आता होणार आहे. काही गावाच्या ग्रामसभा तहकूब झाल्या आहेत अशा गावातून येणार्‍या अर्जाची छाननी पुढील टप्प्यात होणार असल्याचे सांगण्यात येते. 

शासनाने  दिलेल्या तेरा निकषाची माहिती

मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन ही माहिती भरली जाणार आहे. मात्र, यातील कोणत्या निकषानुसार योजनेला पात्र ठरणार हे स्पष्ट केले नाही. त्यामुळे घरकुलाच्या लाभासाठी पात्र, अपात्रता गुलदस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.  या छाननी निकषात दुचाकी, चारचाकी वाहनगाडी, 50 हजार किंवा त्यावरील किसान कार्ड, शासकीय सेवेत कुटुंबातील व्यक्‍ती, शेती वापराचे वाहन, नोंदणीकृत उद्योगधंदे, 10 हजार मासिक उत्पन्न, इन्कम टॅक्स, व्यावसायक कर, फ्रिज, टेलिफोन, अडीज हजारापेक्षा जास्त शेती, पाच एकर शेतीमध्ये दोन पिके, साडेसात एकरपेक्षा अधिक शेती आहे किंवा नाही, अशी माहिती द्यावयाची आहे.