Sat, Nov 17, 2018 12:09होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून सुरेश प्रभू रणांगणात?

सिंधुदुर्ग-रत्नागिरीमधून सुरेश प्रभू रणांगणात?

Published On: Feb 05 2018 9:47AM | Last Updated: Feb 05 2018 10:22AMअलिबाग : प्रतिनिधी

कोकणात लोकसभेलाही सेना भाजपचा सवता सुभा पाहायला मिळणार असल्याचे संकेत आतापासून मिळू लागले आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याचे मंत्री सुरेश प्रभु यांना रत्नगिरी-सिधुदुर्ग लोकसभा मतदार संघात कामाला लागण्याच्या सुचना भाजपकडून मिळल्या असून रायगड लोकसभा मतदार संघातही भाजप तगडा उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोकणच्या बालेकिल्ल्यात भाजपचाही बोलबाला निर्माण झाला आहे. 

कर्जतमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाजप मेळाव्याला उपस्थिती लावत शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम यांना पक्षात घेतले. कोकणातील आणखीही काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूकीपूर्वी मोठी पंक्षांतरे अपेक्षित आहेत.

एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये गेल्यास नारायण राणेंना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल आणि सुरेश प्रभुंना निवडून आणण्याची जबाबदारी राणेंच्या खांद्यावर दिली जाईल असे सांगितले जात आहे. माजी खासदार निलेश राणे यांना राज्यसभा किंवा विधानपरिषदेचे गाजर भाजप दाखवू शकतो. सुरेश प्रभु आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संयुक्त दौरा करत भाजपच्या नव्या हालचालींची चाहुल दिली. प्रभु रिंगणात उतरले तर शिवसेना खासदार विनाय राऊत यांची जागा अडचणीत येऊ शकते.