Sun, Sep 23, 2018 16:26



होमपेज › Konkan › कोकण मराठी साहित्य परिषदेचे काम व्यापक स्वरूपात रसिकांपर्यंत नेणार

कोकण मराठी साहित्य परिषदेचे काम व्यापक स्वरूपात रसिकांपर्यंत नेणार

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 8:39PM



चिपळूण : प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या बोरिवली उपनगर विभाग अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक व साहित्य क्षेत्रातील अग्रणी कार्यकर्ते सुरेश पालांडे, कार्यवाह म्हणून इंद्रसेन चव्हाण यांची निवड झाली आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे काम व्यापक स्वरूपात हाती घेतले जाईल, अशी माहिती यावेळी पालांडे यांनी दिली.

2018 ते 2019 या कालावधीसाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून सुरेश पालांडे, कार्याध्यक्ष म्हणून अनुराधा नेरुरकर, कार्यवाह इंद्रसेन चव्हाण, कोषाध्यक्ष प्रकाश तावडे, सहकार्यवाह अरविंद हेब्बार, जिल्हा प्रतिनिधी म्हणून यशवंत कदम यांची निवड झाली, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अनुराधा म्हापणकर, रमाकांत ठाकूर, उमा नाबर, जनार्दन पाटील, जगदीश भोवड, उत्तम परब, श्रीकांत राऊत, दत्ता पवार, अनिल मोकाशी यांची बिनविरोध निवड झाली. ‘कोमसाप’च्या मुंबई उपनगर अध्यक्षा गौरी कुलकर्णी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले. 

सुरेशराव पालांडे हे खेड तालुक्यातील पंधरागाव येथील तर इंद्रसेन चव्हाण हे चिपळूण तालुक्यातील पेढांबे गावचे आहेत. ‘कोमसाप’च्या कामाला अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल. कोकणावर आस्था असणार्‍या लेखकांना साहित्यकृतीसाठी परावृत्त केले जाईल व वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, अशी माहिती यावेळी सुरेशराव पालांडे यांनी दिली.