Fri, Apr 26, 2019 09:34होमपेज › Konkan › कुडाळातील सुप्रिया मेहता यांचा बँकॉकमध्ये गौरव

कुडाळातील सुप्रिया मेहता यांचा बँकॉकमध्ये गौरव

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 8:24PMकुडाळ : वार्ताहर

थायलंडची राजधानी बँकॉक येथे नुकत्याच झालेल्या आंतराष्ट्रीय अभ्यास परिषदेनिमित्त घेण्यात आलेल्या इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन युनिर्व्हसिटी (युएसए) च्या विश्‍व संमेलनात इंटरनॅशनल प्राईड ऑफ इंडिया 2018 या पुरस्काराने कुडाळ येथील सौ. सुप्रिया राजू मेहता यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार वर्ल्ड बुक रेकॉर्डकडून देण्यात आला.

बँकॉक येथे कला संस्कृती आदान-प्रदान, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण व युवक कल्याणची आंतराष्ट्रीय अभ्यास परिषद पार पडली.  बँकॉक येथील पर्यटन विभागाच्या आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक डॉ. श्रीम. नीना  यांच्या हस्ते  हा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. या  संमेलनाचे आयोजन आयएसओयु (यु.एस.ए.) व वर्ल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड डीएसी  दुबई अक्रेडिटेशन सेंटर आणि आर.ओ. एच.एस. मॅनेजमेंट यांनी केले होते. संमेलनाध्यक्ष  डॉ. कौशिक गायकवाड, डॉ. दीपक परब, कुलगुरू डॉ. के.आर. महाजन, मार्गदर्शक डॉ. बी.एन. खरात, अमरावती महाविद्यालय डॉ. अंजली ठाकरे, नागपूर विद्यापीठातील अलका सप्रे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अ.ना. रसनकुठे उपस्थित होते. यावेळी भारतातील  100 व्यक्‍तींना वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या लोक कल्याणात्मक सेवेबद्दल डी. लिट पदवी व पुरस्काराचे यावेळी वितरण करण्यात आले.

सौ. सुप्रिया मेहता यांनी महिला सक्षमीकरण, महिलांचे प्रश्‍न कमिटीच्या माध्यमातून हाताळणे व सोडवण्यास मदत करणे यासारख्या विविध सामाजिक कार्यात काम केले. याची दखल घेवून त्यांना या आंतरराष्ट्रीय  पुरस्काराने  गौरविण्यात आले. यापुढेही आपण आपले हे कार्य उविरत चालू ठेवणार असल्याचा मानस या निमित्ताने  व्यक्‍त केला आहे अशी माहिती सौ. मेहता यांनी दिली.