Wed, Jun 26, 2019 17:38होमपेज › Konkan › सुनील चव्हाण नूतन जिल्हाधिकारी

सुनील चव्हाण नूतन जिल्हाधिकारी

Published On: May 02 2018 10:41PM | Last Updated: May 02 2018 10:37PMरत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची मुंबई माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या उपसंचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त सुनील चव्हाण यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे.

शासनाने बुधवारी तब्बल 27 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्याचे मुख्य सचिव म्हणून डी. के. जैन यांची नियुक्‍ती झाल्यानंतर सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. सुनील चव्हाण यांनी जळगाव, नाशिक, नवी मुंबई, मुंबई, पालघर आणि ठाणे येथे प्रशासकीय सेवेत काम केले आहे. ठाणे महानरपालिकेचेअतिरिक्‍त आयुक्‍त म्हणून त्यांनी ‘स्मार्ट सिटी’ अभियानात प्रभावी काम केले आहे. जळगाव यथे ग्रामीण विकास प्रबोधिनीचे प्रकल्प संचालक म्हणूनही ते कार्यरत होते.  

पालघरच्या अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारीपदीही त्यांनी प्रभावी काम केले. मंत्रालयीन कामकाजात त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि जलसंधारण विभागाच्या उपसचिवपदी विशेष कामगिरी केली आहे. 

Tags : kokan news, Ratnagiri, Sunil Chavan, Nutan Collector,