Thu, Jun 27, 2019 01:33होमपेज › Konkan › लोकसभेतील गोंधळ पहायला आलात का?

लोकसभेतील गोंधळ पहायला आलात का?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

संसदेतील गोंधळावरून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व्यथित झालेल्या पहायला मिळाल्या. ‘लोकसभेतील गोंधळ पहायला आलात का?’असा नाराजी व्यक्‍त करणारा सवाल त्यांनी अभ्यास दौर्‍यासाठी दिल्लीला गेलेल्या पत्रकारांना केला. आपल्या खास कक्षात नेऊन त्यांनी चिपळूणमधील पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.

चिपळूणच्या माहेरवाशिण या नात्याने लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी  चिपळुणातील पत्रकारांना आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही वेळ दिला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून चिपळूणमधील पत्रकार दिल्ली येथे अभ्यास दौर्‍यासाठी गेले होते. यावेळी देशाच्या सर्वोच्च सभागृहातील कामकाज अनुभवण्याची संधी पत्रकारांना मिळाली. विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

नुकतेच सभागृह सुरू झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरूद्ध तेलगु देसम आणि वायएसआर यांनी अविश्‍वास ठराव आणला होता. मात्र, या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ सुरू होता. लोकसभा अध्यक्षा सभागृहात शांतता राखण्याचे आवाहन करत होत्या. मात्र, गोंधळ सुरूच होता. अखेर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. पंधरा-वीस मिनिटांचे कामकाज पाहण्याची संधी यानिमित्ताने पत्रकारांना मिळाली.

यानंतर मुक्‍तपणे पत्रकारांशी महाजन यांनी संवाद साधला. सगळ्यांची ओळख करून देण्यात आली. “काय लोकसभेतील गोंधळ पहायला आलात काय...?”. असा त्यांनी आपल्या खास शैलीत प्रश्‍न केला. याप्रसंगी खा. विनायक राऊत यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. लोकसभेत ते चांगले काम करीत असल्याचे आवर्जून सांगितले. चिपळूणच्या समस्या, चौपदरीकरण कोकण रेल्वे याबाबत त्यांनी चर्चा केली. ‘आला आहात तर लोकसभा पाहून जा, ग्रंथालय मुद्दाम पहा... राष्ट्रपती भवन पाहिल्याशिवाय जाऊ नका, असेही सांगितले. यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम आणि पत्रकार उपस्थित होते.             

Tags : Kokan, Kokan News, Sumitra Mahajan, confusion, Lok Sabha, reporters 


  •