होमपेज › Konkan › वाळू उत्खनन अहवाल सादर करा! : ना. केसरकर

वाळू उत्खनन अहवाल सादर करा! : ना. केसरकर

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 9:06PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील वालावल, मोचेमाड, कर्ली आदी खाड्यातील आतापर्यंतच्या वाळू उत्खननानुसार या खाड्यांचे चॅनेल क्लिअर होणे आवश्यक होते. याबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, उपविभागीय अधिकारी, संबंधित तहसीलदार तसेच पोलिस अधिकारी यांनी संयुक्‍त तपासणी करुन सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बैठकीत दिले.

वाळू उत्खनन संदर्भात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात  पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वाळू उत्खननाबाबत सविस्तर आढावा त्यांनी घेतला. मेरीटाईम बोर्डाने रेखांकन करुन दिल्यानुसार खाडीत झेंडे लावले आहेत का? किती होड्या वाळू उत्खनन करतात? किती ब्रास वाळू काढली जाते? पासेस याबाबत या पथकाने संयुक्‍तरित्या तपासणी वस्तुनिष्ठ अहवाल तत्काळ सादर करावा, अशी सूचना करुन ना. केसरकर यांनी यासंदर्भात सविस्तर आढावा घेतला.

बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, नीता शिंदे, खनिकर्म अधिकारी अरुण दिवेकर, तहसीलदार शरद गोसावी, वनिता पाटील, मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन अजित तोपणो, बंदर निरीक्षक श्री. वेंगुर्लेकर, सहा. बंदर अधिकारी अनंत गोसावी आदी उपस्थित होते.