Fri, Jul 19, 2019 07:50होमपेज › Konkan › विद्यार्थी,शिक्षक रमले शिक्षणाच्या वारीत

विद्यार्थी,शिक्षक रमले शिक्षणाच्या वारीत

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 10:15PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

प्राथमिक, माध्यमिक, डाएट परिवार यांच्या वतीने  ‘शिक्षण वारी’ यशस्वी होण्यासाठी एम.डी. नाईक हॉल येथे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार एकवटत आहेत. शिक्षणाच्या वारीचे उद्घाटन गुरूवारी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या करण्यात आलेे. शुक्रवारी शिक्षणाच्या वारीचा आनंद शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी घेतला. शिक्षणाच्या वारी कार्यक्रमाचे यजमानपद यावेळी रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले आहे याचा फायदा जिल्ह्यातील अनेक शिक्षक घेत आहेत.

जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, ‘डाएट’ चे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी महेश जोशी, प्राथमिक उपशिक्षणाधिकरी  डी. बी. सोपनूर या वारीसाठी झटत आहेत. महाराष्ट्रातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयत्न करणारे शिक्षकांनी आपले शैक्षणिक स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. शैक्षणिक उपक्रमांवर आधारित महाराष्ट्रातील निवडक 55 स्टॉल्स वारीमध्ये लक्षवेधी ठरत आहेत. 

शुक्रवारी रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तंत्रस्नेही शिक्षकांनी सकाळ सत्रात तर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, गुहागर, चिपळूण तालुक्यातील निवडक शिक्षकांनी शैक्षणिक स्टॉलला भेटी दिल्या. 
शिक्षण वारीतील 50 शैक्षणिक स्टॉलमध्ये अनेक नावीन्यपूर्ण स्टॉल असून विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देणारे आहेत. यामध्ये टाकावू वस्तूंपासून तयार केलेला सूक्ष्मदर्शक, लाकडी चकत्या वापरून चढता उतरता क्रम समजावून देणे, ज्ञानरचनावादी अध्ययन साहित्य लक्षवेधी ठरत आहे.दोन दिवसांत 5 हजार पेक्षा जास्त शिक्षकांनी शिक्षण वारीला भेट दिली.