होमपेज › Konkan › नवोदितांसाठी पुरस्कार प्रेरणादायी

नवोदितांसाठी पुरस्कार प्रेरणादायी

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 8:52PM

बुकमार्क करा
देवरुख : प्रतिनिधी

समता,स्वातंत्र्य,बंधुता हि त्रिसूत्री गेली 11 वर्ष सचोटीने जोपासत समाजातील गुणवंतांना राज्यस्तरीय पुरस्कार देवून विश्‍वसमता कलामंचने नवोदितांना प्रोत्साहन दिले आहे. खर्‍या अर्थाने पुरस्कारच प्रेरणादायी ठरतात. त्यामुळे पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी यापुढे सामाजिक बांधिलकी जपत जे चांगले आहे ते स्विकारले पाहिजे, तसेच समाजात शांतता राहिल असे कार्य केले पाहिजे, असे मत जि.प.सदस्य रोहन बने यांनी व्यक्त केले.

देवरुख पंचायत समिती सभागृहात विश्‍वसमता कलामंच आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बने बोलत होते. यावेळी सभापती सारीका जाधव, युयुत्सु आर्ते, जि.प.सदस्या माधवी गीते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवराय,तथागत गौतम बुद्ध, ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन झाले. 

विश्‍वसमता कलामंचतर्फे घेण्यात आलेल्या सुनिल पवार स्मृती रंगरंजन स्पर्धा गौरवपत्रे प्रदान करण्यात आली. काव्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोख  रक्कम, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. कला, क्रीडा, पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक यासारख्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या  व्यक्तिंना विश्‍वसमता पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यामध्ये पत्रकार सुरेश करंडे, जलतरणपटू अश्‍विनी नलावडे, गायिका उषा पवार या तिघांना गौरवण्यात आले.संस्था पुरस्कारात आंगवली येथील सृष्टीज्ञान संस्थेला गौरवण्यात आले. यावेळी तापमान व हवामान यावर अभ्यास करणार्‍या स्विडनच्या दोघी मुली उपस्थित होत्या.

यावेळी रोहन बने यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सकारात्मक उर्जा देणारी कार्ये करत रहा असा सल्ला दिला. युयुत्सु आर्ते यांनी यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला.