Thu, Jun 20, 2019 06:29होमपेज › Konkan › ओणीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

ओणीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

Published On: Dec 16 2017 1:44AM | Last Updated: Dec 15 2017 8:43PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील ओणी येथील ओणी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जयवंत दळवी स्मृती राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेचे सलग पाचव्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त साने गुरूजी राज्यस्तरीय खुली साहित्य अभिवाचन स्पर्धाही आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थाध्यक्ष वासदेव तुळसणकर यांनी दिली. 

यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप संसारे, प्रा. विनोद मिरगुले आदी उपस्थित होते. यानिमित्त सांस्कृतिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले असून, शुक्रवार दि.15 रोजी सायंकाळी 5 वा. नूतन विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. चंद्रकांत बावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटन अरविंद गोसावी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी 7.30 वा. जयवंत दळवी स्मृती राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. संस्थाचे कार्याध्यक्ष प्रदीप संसारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमाचे संस्थाध्यक्ष  तुळसणकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शनिवार दि. 16 कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी 5 वा. होणार आहे. 

गणपत भारती यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटन महादेव धुरे यांच्याहस्ते होणार आहे. रविवार दि.17 रोजी रात्री 9 वा., जयवंत दळवी स्मृती राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे. संस्थाध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमाला दिग्दर्शक, लेखक अभिनेते राजेश देशपांडे, दिग्दर्शक बाळ रणखांबे, दिग्दर्शक हेमंत भालेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष तुळसणकर यांनी केले आहे.