Fri, May 24, 2019 20:32होमपेज › Konkan › स्वच्छ महाराष्ट्र चळवळीत तरुणांची भूमिका महत्त्वाची : ना. लोणीकर

स्वच्छ महाराष्ट्र चळवळीत तरुणांची भूमिका महत्त्वाची : ना. लोणीकर

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 10:49PMओरोस : प्रतिनीधी 

युवापिढीने पुढाकार घेतला तर कोणतीही चळवळ यशस्वी होऊन समाज परिवर्तन घडते म्हणून आपल्या राज्याची युवा पिढी स्वच्छता अभियानामध्ये उतरली पाहिजे. स्वच्छतेचे महत्व शेवटच्या माणसापर्यंत नेण्याची आणि त्यांच्यात प्रबोधन घडविण्याची जबाबदारी तरुण पिढीची असून ही चळवळ यशस्वी करण्यामध्ये युवा पिढीची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.   

राज्यस्तरीय स्वच्छतामित्र वक्‍तृत्त्व करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सी.एफ.सी. सभागृहात पार पडला. यावेळी श्री. लोणीकर बोलत होते. विभागीय आयुक्‍त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड, पाणी पुरवठा व स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक सतीष उमरीकर आदी उपस्थित होते. 

लेाणीकर म्हणाले, देशाला महासत्ता बनवायचे असेल तर देश निरोगी असणे गरजेचे आहे. देश निरोगी राहण्यासाठी स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने स्वच्छतेची सुरुवात स्वत:पासून केल्यास राज्य आणि पर्यायाने देश स्वच्छ होईल. 

स्वच्छतेच्या बाबतीत मराठवाडा मागे होता पण आता ही चळवळ व्यापक झाली असून याचे दृष्य परिणाम पाहायला मिळत आहेत. महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांनी ही चळवळ मोठ्या प्रमाणावर राबविली. व्यक्‍तिगत स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व घराघरात पोहचविण्यासाठी आयुष्य वेचले. राज्यात 20 जिल्हे, 254 तालुके, 24 हजार 666 गा्रमपंचायती आणि 35 हजार गांवे हागणदारीमुक्त करण्यात शासनाला यश आले आहे. पंढरपुर शहरात वारकर्‍यांसाठी दरवर्षी 27 हजार शौचालयांची व्यवस्था करण्यात येते. स्वच्छतेचा संदेश कीर्तनाच्या माध्यमातून जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी 300 कीर्तनकारांची कार्यशाळा घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. 

विभागीय आयुक्‍त डॉ. भापकर म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याने आणि विशेषत: मराठवाड्याने स्वच्छतेच्या चळवळीत यश संपादन केले आहे. मार्च 2018 पर्यंत राज्य हांगणदारीमुक्‍त करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांनीही  मनोगत व्यक्‍त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविकात राज्य समन्वयक कुमार खेडकर यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक अरुण रसाळ यांनी केले. 

स्पर्धेचा निकाल- राज्यस्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा -2017-18  (वरिष्ठ गट)प्रथम -अविनाश भारती (औरंगाबाद ),व्दितीय-  उमेश सुर्यवंशी (पुणे जिल्हा),तृतीय- शुभम केंद्रे (नांदेड ),प्रोत्साहनपर बक्षिसे-कृष्णा तवले (उस्मानाबाद), संपदा आंब्रे (रत्नागिरी),राहुल गिरी (बीड),अक्षय पाटील(सांगली),स्नेहल सोनावणे(नाशिक),राज्यस्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा (कनिष्ठ गट) प्रथम - पोर्णिमा (औरंगाबाद),व्दितीय चैतन्या सावंत (सिंधुदुर्ग),तृतीय - रोहन कवडे(सोलापूर),प्रोत्साहनपर बक्षिसे-अभिषेक खोडके (नागपुर), प्रतीक्षा बांगर (ठाणे), आशुतोष निकम (सातारा), ईशा देशपांडे (नांदेड),कोमल पाटील (रायगड).