Sat, Nov 17, 2018 20:34होमपेज › Konkan › ‘ओखी’च्या नुकसानीची मोजदाद सुरू

‘ओखी’च्या नुकसानीची मोजदाद सुरू

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 10:03PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणात ओखी   चक्रीवादळातील आपदग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असून नियमानुसार त्यांना मदत देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कृषी विभागाला सूचना करण्यात आल्या असून कोकणातील ओखी वादळात झालेल्या नुकसानीची मोजदाद सुरू करण्यात आली आहे. 

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओखी वादळामुळे नुकसान झालेे. रायगड जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे 300 हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झालेल्या कडधान्य व भाजीपाला पिकांचे प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ओखी चक्रीवादळामुळे रत्नागिरी तालुक्यातील जाकीमिर्‍या येथील 52 मच्छिमारांची जाळी वाहून गेल्याने अंदाजे 43.26 लाख रुपयांचे नुकसान झालेले असून यासंबंधी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्यामार्फत पंचनामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

ओखी वादळामुळे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू असून आपदग्रस्तांना नियमानुसार मदत देण्यात येणार आहे. तसेच ऐन आंबा हंगामाच्या  आरंभीच्या टप्प्यात ओखीने झालेल्या पावसामुळे आंबा पिकावर झालेल्या परिणामांचेही सर्वेक्षण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

तीन ते सहा डिसेंबर याकालवधीत ओखी वादजळाच्या प्रभावामुळे  कोकणात काही भागात मुसळधार तर काही भागात पावसाचा शिडकावा जाला. तसेच त्यामुळे ऐन फुटवा धरण्याच्या काळात मोहर गळून पडला. त्यामुळे आंबा उशीरा येण्याची बागायतदरांत भीती आहे.  या परिणामांसाठी कालावधी लागणार असला तरी चालू हंगामातील स्थितीबाबत  अभ्यास करुन त्वरीत उपाययोजना करण्याच्या  सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत.