Thu, Nov 15, 2018 23:01होमपेज › Konkan › गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरुन एकेरी वाहतूक सुरू करा

गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरुन एकेरी वाहतूक सुरू करा

Published On: Jul 02 2018 1:44AM | Last Updated: Jul 02 2018 12:28AMसिंधुदुर्ग : प्रतिनिधी

गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा घेतला.  जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे. मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, कणकवली प्रांताधिकारी नीता सावंत, कुडाळ प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सर्वसाधारण नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून महामार्गावर येणार्‍या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी योग्य ती व्यवस्था करावी असे सांगून पालकमंत्री म्हणाले, खड्डयांच्या ठिकाणी अपघात होऊ नयेत यासाठी उपाय योजना कराव्यात. त्याठिकाणी कर्मचार्‍याची नियुक्‍ती करावेत. कॉलम लवकर भरावेत. मोर्‍यांची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. बैठकीमध्ये पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन विषयी आढावा घेतला. यावर्षीचे नियोजन व गत वर्षीचा खर्च या विषयी चर्चा करण्यात आली. चांदा ते बांदा, डोंगरी विकास योजना, गौन खनिज, कोकण ग्रामीण पर्यटन या संदर्भातील आढावा घेतला.