Wed, Mar 20, 2019 02:58होमपेज › Konkan › कुडाळात मान्सून महोत्सवाला जल्लोषात प्रारंभ

कुडाळात मान्सून महोत्सवाला जल्लोषात प्रारंभ

Published On: Jul 07 2018 9:10PM | Last Updated: Jul 07 2018 9:10PMकुडाळ : प्रतिनिधी 

कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित मान्सून महोत्सवाला शनिवारी असंख्य नाट्यरसिकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला. यावेळी सादर झालेल्या दशावतारी नाटकाला उपस्थित नाट्यरसिकांनी भरभरून दाद दिली.

कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित मान्सून महोत्सवाचे शानदार उद्घाटन शनिवारी येथील सिद्धिविनायक हॉल येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुडाळ न.पं.चे उपनगराध्यक्ष अनंत (आबा) धडाम व सभापती राजन जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तर रंगमंचाचे उद्घाटन गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी उद्योजक प्रसाद रेगे, नगरसेवक ओंकार तेली, बाळा वेंगुर्लेकर, सुनील बांदेकर, गणेश भोगटे, माजी पं.स.सदस्य अतुल बंगे, लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर, भजनी बुवा प्रकाश पारकर, महोत्सवाचे सर्वेसर्वा राजेश म्हाडेश्वर, कवठी युवक मित्रमंडळ,मुंबईचे अध्यक्ष संजय करलकर, सिंधुदुर्ग जिल्हा दशावतारी संघटनेचे अध्यक्ष बाळा सावंत, दिनेश गोरे, कवठीचे सरपंच रूपेश वाडयेकर,बाजार बॉईजचे अध्यक्ष विठ्ठल धडाम,उद्योजक गजानन गावस (गोवा), प्रसाद परब, अमोल राणे, संजय मांजरेकर, गजा कवठकर, पोलिस पाटील अनंत कुडाळकर आदींसह लाजरी क्रिकेट ग्रुपचे कार्यकर्ते व नाट्यरसिक उपस्थित होते. यावेळी लाजरी क्रिकेट ग्रुपचे सदस्य कै.वाय.जी.शिरसाट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

राजेश म्हाडेश्वर यांच्या प्रेरणेतून लाजरी क्रिकेट ग्रुप हा मान्सून महोत्सव साजरा करीत आहे. महोत्सवाचे यंदाचे सहावे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने नाट्यरसिकांनी महोत्सवाला मोठी उपस्थिती दर्शविली. उपस्थित मान्यवरांनी लाजरी क्रिकेट ग्रुपच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीच्या नामवंत दशावतारी कलावंतांचा सहभाग असलेला वीर बब्रुवाहन नाट्यप्रयोग हा नाट्यप्रयोग सादर झाला. यात गणपती - पांडुरंग कलिंगण, रिद्धीसिद्धी - प्रथमेश परब, अर्जुन - राधाकृष्ण उर्फ बाबली नाईक, मेघवर्ण - पप्पू नांदोसकर, वृषकेत - दत्तप्रसाद शेणई, भीम - नाना प्रभू, शेष - बाबा मयेकर, हंसध्वज - यशवंत तेंडोलकर, चित्रांगी - प्रशांत मेस्त्री, उलुपी - सुधीर तांडेल, कृष्ण - आनंद कोरगांवकर, बब्रुवाहन - सुधीर कलिंगण या कलाकारांनी सहभाग घेत भारदस्त भूमिका साकारत अप्रतिम सादरीकरण केले. त्यांना हार्मोनिअम - पप्पू घाडीगांवकर, मृदंगमणी - बाबा मेस्त्री व तालरक्षक - विनायक सावंत यांनी संगीत साथ दिली. निवेदन बादल चौधरी यांनी केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी लाजरी क्रिकेट ग्रृपचे दिपक भोगटे, स्वरूप (गोट्या) सावंत, सिद्धेश वर्दम, सिद्धेश बांदेकर, दिनार शिरसाट,विकी कोरगांवकर, कौस्तुभ पाटणकर, अतुल गावडे, मयुर कुडतरकर, नागेश नार्वेकर, तेजस पणदूरकर, गोट्या कोरगांवकर आदींसह सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्‍हणजे, रविवार दि. 8 जुलै रोजी सायं. 6 वा. प्रतिकृष्ण  हा संयुक्त दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील निवडक आघाडीच्या कलाकारांचा सहभाग असणार आहे.