Thu, Jul 18, 2019 21:32होमपेज › Konkan › दिव्यांगांसाठी तहसीलमध्ये त्वरित स्वतंत्र कक्ष सुरू करा

दिव्यांगांसाठी तहसीलमध्ये त्वरित स्वतंत्र कक्ष सुरू करा

Published On: Apr 24 2018 11:17PM | Last Updated: Apr 24 2018 10:58PMदोडामार्ग ः प्रतिनिधी

तालुक्यातील दिव्यागांना शासकीय योजना व माहितीसाठी तहसीलदारमध्ये स्वतंत्र केंद्र स्थापन करावे, अशी मागणी तालुका सरपंच सेवा संघ आणि साईकृपा अपंग शक्‍ती बहुउद्देशीय संस्था यांनी दोडामार्ग तहसीलदार यांच्याकडे करीत दिव्यागांना एका छताखाली सेवा मिळण्यासाठी मेळावा आयोजित करा, अशीही मागणी केली.

दोडामार्ग तालुक्यातील दिव्यांग बांधवांना विविध योजनाचा लाभ मिळावा आणि सर्व  दिव्यांग बांधव एकत्र यावेत, यासाठी विशेष बैठकीचे आयोजन सरपंच सेवा संघ आणि साईकृपा अपंग शक्‍ती बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने करण्यात आले होते. सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण गवस यांसह अनिल शिंगाडे, दिलीप पेडणेकर, प्रसाद रेडकर, राजेश मणेरीकर, भाऊ करमळकर, सुनील जाधव, साक्षी नाईक, प्रणिता ठाकुर आदी उपस्थित होते.

तालुक्यातील गणेश मंदिरात ही बैठक झाली. तालुक्यातील दिव्यांगाची संख्या, दिव्यांग प्रकार आदींसह समस्यांवर चर्चा झाली. तालुका हा भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ असल्याने दिव्यांगाना सेवा मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे दाखला व विविध समस्या एका छताखाली देण्यासाठी मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले. शिवाय तहसीलदार कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन व्हावा अशी मागणी चर्चा झाली. बैठक संपल्यावर उपस्थितांनी दोडामार्ग तहसीलदार यांच्याशी चर्चा केली. तहसीलदार रोहिणी रजपूत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे संघटनेचे प्रवीण गवस यांनी सांगितले.