Sat, May 25, 2019 23:16होमपेज › Konkan › क्रीडा महोत्सव एक चळवळ बनावी!

क्रीडा महोत्सव एक चळवळ बनावी!

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:31PM

बुकमार्क करा
वैभववाडी : प्रतिनिधी 

क्रीडा महोत्सवातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले पाहिजे. यासाठी हे महोत्सव केवळ कार्यक्रम न होता ती एक चळवळ झाली पाहिजे. असे प्रतिपादन आ. नितेश राणे यांनी व्यक्‍त केले.
वैभववाडी तालुकास्तरीय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार 

स्पर्धेचे उद्घाटन आमदार राणे यांच्या हस्ते लोरे नं 2 याठिकाणी पार पडले. यावेळी ते बोलत होते. सभापती लक्ष्मण रावराणे, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, उपसभापती हर्षदा हरयाण, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, पल्लवी झिमाळ, पं. स.सदस्य अरविंद रावराणे, दिगंबर पाटील, भालचंद्र साठे, बाळा हरयाण, वैशाली रावराणे, प्राची तावडे, शुभांगी पवार, सरपंच महेंद्र रावराणे, मंगला पेडणेकर, गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे, गटशिक्षणाधिकारी मारुती थिटे, केंद्र प्रमुख गौतम तांबे, विजय केळकर, मुख्याध्यपिका सौ.राणे, संतोष मोरे आदी उपस्थित 
होते.