बांदा : वार्ताहर
रायपूर (छत्तीसगड) येथून गोव्याच्या दिशेने अवैध स्पिरिटची वाहतूक करणार्या टँकरवर बांदा पोलिसांनी शनिवारी पहाटे पोलिस तपासणी नाक्यावर सापळा रचून कारवाई केली. यात बांदा पोलिसांनी 13 लाख 50 हजार रुपये किमतीच्या स्पिरिटसह तब्बल 21 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी टँकरचालक रफिदीन इस्माईल (49, रा. बरदिनगर, ता. येट्टूपालायम, जि. कोईम्बतूर, तामिळनाडू) याला अटक करण्यात आली.बांदा पोलिसांनी अलीकडच्या काळात केलेली स्पिरिट वाहतूक विरोधातील सर्वात मोठी कारवाई आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलिस सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, हवालदार महेंद्र बांदेकर, संजय कदम, प्रीतम कदम, प्रसाद कदम, अभिजित भाबल यांनी शुक्रवारी संध्याकाळपासूनच महामार्गावर सापळा रचला होता.
पोलिसांना दोनवेळा हुलकावणी
पोलिसांनी मध्यरात्री दोनवेळा अन्य दोन टँकरचा महामार्गावर पाठलाग केला.पण या दोन्ही टँकरमध्ये स्पिरिट नसल्याने पोलिसांना हुलकावणी देण्यात आली.