Thu, Aug 22, 2019 08:35



होमपेज › Konkan › कोकण रेल्वे मार्गावर ८ जूनला विशेष गाडी

कोकण रेल्वे मार्गावर ८ जूनला विशेष गाडी

Published On: Jun 04 2018 1:04AM | Last Updated: Jun 03 2018 10:40PM



रत्नागिरी : खास प्रतिनिधी 

कोकण रेल्वे मार्गावर दि. 8 रोजी विशेष गाडी धावणार आहे. पुणे जंक्शन ते मडगाव दरम्यान ही गाडी धावणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

कोकण रेल्वे मार्गे धावणारी गाडी दि. 8 रोजी सायंकाळी 6.45 वा. पुणे  जंक्शन येथून सुटणार असून दुसर्‍या दिवशी सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी गोव्यात मडगाव स्थानकावर पोहचणार आहे. पंधरा डब्यांच्या या गाडीला सेकंड सीटींग 11, चेअर कार 2 तसेच दोन एसएलआर डबे अशी रचना आहे.

ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. ऐन गर्दीच्या हंगामात पुणे ते मडगाव दरम्यान विशेष गाडीचे नियोजन करण्यात आल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टळली आहे.