Wed, Dec 19, 2018 21:01होमपेज › Konkan › पार्ले : कार अपघातात ६ जण जखमी

पार्ले : कार अपघातात ६ जण जखमी

Published On: Aug 24 2018 8:27PM | Last Updated: Aug 24 2018 7:35PMपोलादपूर (रायगड) : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर पार्ले गावच्या हद्दीत चालकाचा कारवरील ताबा सुटुन झायलो कार पलटी झाली. या अपघातात ६ जण जखमी झाले. आज, शुक्रवार (दि. २४ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कल्याण येथील नितीन कोरडे हे आपल्या कुटुंबासोबत कल्याणहून चिपळूण दिशेने झायलो कार (एम एच १४ डी डब्ल्यू ९८३९) मधून निघाले होते. पार्ले गावाजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटून महामार्गावरील चौपदरीकरण कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात ही कार पलटी झाली. आदर्श निखील कोरडे (वय २०) व ऋतुजा नितीन कोरडे (वय १८) या दोघांना किरकोळ दुखापत झाल्याने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कविता कोरडे (वय ३५), वडील नितीन  कोरडे (वय ४५) सर्व राहणार कल्याण व  सुशील फरांदे (वय ३१), वर्षा फरांदे  (वय ३०) रा. पुणे यांना गंभीर दुखापत झाल्याने महाड येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलिस ठाण्यात उशिरा दाखल करण्यात आली.