Wed, Nov 21, 2018 15:23होमपेज › Konkan › सांगिर्डेवाडीत सापडला सहा फुटी अजगर

सांगिर्डेवाडीत सापडला सहा फुटी अजगर

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 8:30PM

बुकमार्क करा
पणदूर  : वार्ताहर 

कुडाळ- सांगिर्डेवाडी येथे शेतमळ्यात 6 फूट लांबीचा अजगर आढळून  आला. वाडीतील तरूणांनी तिथे वावरणार्‍या  शेतकर्‍यांना धोका पोहचू नये म्हणून त्या अजगराला पकडून  दुसरीकडे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. सांगिर्डेवाडीतील शेतमळ्यात शेतपंपाजवळ एका काजूच्या झाडावर हा अजगर विळखा घालून होता.

तिथे बांबू तोड करणार्‍या कामगारांच्या नजरेस पडल्यावर त्यांनी ताबडतोब वाडीतील ग्रामस्थांना याची कल्पना दिली.  शेतात वावरणार्‍या महिला, वृध्द शेतकर्‍यांना धोका पोहचू नये म्हणून सांगिर्डेवाडीतील अविनाश परब, अमेय परब, कृष्ण मेस्त्री, चेतन परब आदी तरूणांनी त्याला पकडून दुसरीकडे नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडून दिले.