Sun, May 26, 2019 13:26होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात आता समृध्दी येईल : पालकमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गात आता समृध्दी येईल : पालकमंत्री दीपक केसरकर

Published On: Sep 13 2018 1:45AM | Last Updated: Sep 12 2018 9:56PMकुडाळ : प्रतिनिधी

विमानतळ वाहतूक प्राधिकरण, हवाई वाहतूक मंत्रालय व इतरांच्या सर्व परवानग्या घेवूनच हे विमानाचे ट्रायल लॅण्डींग करण्यात आले आहे. 12 डिसेंबरपासून नियमित विमान वाहतूक सुरू होणार असून त्या दिवशी माल्टा देशाचे अध्यक्ष तेथील विमानाने सिंधुदुर्ग विमानतळावर उतरणार आहेत. आता खर्‍या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात समृध्दीचा मार्ग खुला झाला आहे. या वर्षात विमान वाहतूक सुरू होईलच त्याशिवाय मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणही पूर्ण होत आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चिपी येथे सिंधुदुर्ग विमानतळाच्या पहिल्या लॅण्डींग प्रसंगी आयोजित सोहळ्यात केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित अशा ‘ग्रिन फिल्ड’ चिपी विमानतळावर बुधवार 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11.45 वाजता फाल्कन-2000 हे बारा सीटर विमान गणपती बाप्पाला घेवून दिमाखात ‘लॅडिंग’ झाले व 1.45 वाजता सुमारास ‘टेक ऑफ’ घेत पुन्हा  आकाशात झेपावले. विमानाचे स्वागत व गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर येथील मंडपात स्वागतपर कार्यक्रम झाला.  पालकमंत्री दीपक केसरकर, खा . विनायक राऊत, आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, आयआरबीचे सहव्यवस्थापकीय संचालक सुधीर होशिंग, कल्याण -डोंबवलीचे महापौर विनीता राणे, माजी आ.राजन तेली, अ‍ॅड. अजित गोगटे, पुष्पसेन सावंत प्रकल्प संचालक किरण कुमार, विवेक देवस्थळी, प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर, जनसंपर्क अधिकारी जयंत डांगरे,मनोज चौधरी, योगेश मेहत्रेे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सुनिल म्हापणकर, सरपंच योगेश तारी आदी उपस्थित होते. 

ना. केसरकर म्हणाले, चिपी विमानतळावर टेस्ट लॅडिंगकरिता परवानगी मिळते की नाही अशी परिस्थिती होती. मात्र, मुख्यमंत्र्यांशी भेट घेवून टेस्ट लॅडिंगबाबत खात्री करून घेतली. अनेक जण म्हणतात विमानतळाचे काम अर्धवट आहे. मुळात परवानगीसाठी 62 पॉईंट पैकी 52 पॉईंटची एअरपार्ट अ‍ॅथॉरीटीकडे आयआरबी कंपनीने पूर्तता केली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच कोकण विकासाच स्वप्न होत त्याकरीता पक्ष प्रमुख उद‍्धव ठाकरे या विमान लॅडिंग करीता उपस्थित राहणार होते. मुख्यमंत्री फडणवीस,केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची सुध्दा उपस्थिती राहणार होती मात्र व्हीआयपींना विमान लॅडिंगबाबत परवानगी न मिळाल्याने ते येवू शकले नाहीत मात्र त्या सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. चिपी विमानतळ हे सिधुदुर्ग विकासाचे द्वार ठरेल.12 डिसेंबरला ज्यावेळी पहिले विमान चिपी विमानतळावर लॅडिंग होईल त्या कार्यक्रमासाठी सर्व व्हिआयपी मंडळी उपस्थित राहणार आहेत. आपला हा विमानतळ आंतरराष्ट्रीय झाला पाहिजे म्हणून कारगो हब शी वाटा-घाटी सुरू आहेत.

त्या वाटा घाटी यशस्वी झाल्या तर किनारपट्टीवरचा पहिला  ‘स्टीमिलेटर’  व  पहिल ‘एव्हीएशन स्कूल’ याच विमानतळावर होईल. ज्या लोकांच्या जमिनी किनारपट्टी लगत आहेत. त्यांना  ‘उडान क्‍वाटेज’ योजने अंतर्गत शासनाच्या माध्यमातुन घर बांधुन दिली जातील. पर्यटनाची ही योजना महीन्याभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवली जाईल त्या घरामध्ये माल्टा देशाचे अध्यक्ष राहतील असा विश्‍वास व्यक्‍त केला. चिपी येथील स्थानिक 260 लोकांना स्किल डेव्हलमेंट प्रशिक्षण देवून आवश्यक त्या लोकांना  या प्रकल्पात सामावून घ्यावे कारण येथील भुमिपूत्रांनी आपल्या जमिनी कीती रूपयाला दिल्या. पेन्सिलने नोंदी घालून जमिनी कुणी कशा लुबाडल्या? हे आपल्याला माहिती आहे. हा माझा मतदार संघ आहे लुबाडणारी माणसे सुध्दा असतात आणि समृध्दी देणारे सुध्दा असतात. आम्हाला जिल्ह्यात समृध्दी आणायची आहे त्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे आ. केसरकर यांनी सांगितले. 

आ. वैभव नाईक यांनीही टेस्ट लॅडिंगसाठी ना. केसरकर, खा. राऊत यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच हे सर्व घडून आल्याचे सांगितले. यावेळी पांढरपट्टे म्हणाले की माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण आहे. कोकण रेल्वे कोकणात आल्यानंतर एक क्रांती झाली तसेच आता विमानतळावर विमान उतरल्याने कोकणात ही दुसरी क्रांती झाल्याचे सांगितले. 

सुधिर होसींग म्हणाले, चिपी विमानतळावर 200 प्रवाशांच विमान उतरू शकते चांगला प्रतिसाद मिळाल्यास विमानतळाच्या रन-वे ची लांबी वाढविली जाणार आहे.सद्यस्थितीत 3 विमाने पार्क होतील अशी जागा असून भविष्यात  या विमानतळावर 12 विमाने उतरू शकतात. कुठल्याही मौसमात विमाने उतरतिल अशी व्यवस्था करण्यात आले आहे. आयआरबी कंपनी म्हणून आम्ही प्रयत्न केले, राजकीय इच्छा शक्‍तीच्या एकीमुळे हे शक्य झाल्याचे सांगितले. यावेळी राजन तेली यांनीही मनोगत व्यक्‍त केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात जिल्हावासियांनी उपस्थिती दर्शवली होती.

प्रकल्पग्रस्तांनी दिलेले नोकरीचे अर्ज आयआरबी कंपनीकडे ना. केसरकर यांनी सुपूर्त केले.यावेळी  जमीन गेलेल्या शेतकर्‍याचा ना.केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लॅडिंग कार्यक्रमा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग पोलिस तसेच कंपनीने खाजगी सुरक्षा तैनात होती.

गणपतीच्या आगमनाने शुभारंभ होणारे पहिले विमानतळ

17 वर्षानंतर सिझरींग करून  अपत्याला जन्म द्यावा लागला. भारत देशात चिपी हे पहिले विमानतळ आहे की ज्या विमानतळाचा शुभारंभ गणपतीच्या आगमनाने झाला. ना. प्र्रभु यांनी 26 जुलैला घेतलेल्या दिल्‍ली येथील बैठकीत 12 सप्टेंबर ही तारीख निश्‍चित झाली होती. 4 वर्षात मी स्वतः एव्हिएशन कमिटीत काम करत आहे. आता उडाण योजने अंतर्गत चिपी विमानतळाचा समावेश झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सुध्दा विमान प्रवास सुखकर होईल. शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना या विमानतळाचे भुमिपूजन झाले आणि  आता शिवसेनेचेच पालकमंत्री असताना विमान टेस्ट लॅडिंगचा  शुभारंभ झाला असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.