Sun, Jul 21, 2019 01:57होमपेज › Konkan › ‘सिंधुदुर्ग’ची वैशिष्ट्ये होणार ‘ग्लोबल’

‘सिंधुदुर्ग’ची वैशिष्ट्ये होणार ‘ग्लोबल’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग अणि  समुद्र किनारे हे शेजारच्या गोवा राज्यापेक्षा खूप सुंदर आणि स्वच्छ आहेत. याचबरोबर येथील आंबा, काजू, कोकम, जांभूळ आदी विविध फळेही सुमधूर आहेत. लोककलाही महत्त्वाच्या आहेत. मात्र, ती जगाला माहीत नाहीत. ही माहिती करून देऊन या जिल्ह्याचा पर्यटन व उद्योग यांच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी एक योजना आखली आहे. या योजनेच्या पूर्ततेसाठी या जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी आम्ही केंद्रीय अधिकारी जिल्ह्यात दाखल झालो आहोत. वनसंज्ञा आणि सी. आर.झेड चाही प्रश्‍न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय उद्योग विभागाचे सहसचिव सुधांशू पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

केंद्रीय वाणिज्य, उद्योग व हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध खात्यांच्या केंद्रीय वरिष्ठ अधिकार्‍यांनी हजेरी लावून येथील निसर्ग, निसर्गदत्त फळे याचबरोबर येथील लोककला, प्रश्‍न, येथील साधनसामग्री क्षमता यांची पाहणी करून कोणकोणते विषय कोणकोणत्या खात्यांतर्गत घेता येतील याबाबतची बारकाईने तपासणी केली.

Tags : Sindhudurg, Global  


  •