Sun, Nov 18, 2018 03:56होमपेज › Konkan › पर्यटन विकासात सिंधुदुर्ग सर्वात पुढे असेल : ना. दीपक केसरकर

पर्यटन विकासात सिंधुदुर्ग सर्वात पुढे असेल : ना. दीपक केसरकर

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:27PMदेवगड : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकासामध्ये केरळ व गोवा राज्यांच्या पुढे असेल, असा विश्‍वास पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 30 वा व्यापारी एकता मेळावा जामसंडे येथील कै. मोरेश्‍वर जनार्दन गोगटे, सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणामध्ये झाला.  खा. राऊत म्हणाले, केंद्राच्या स्वदेश दर्शनमध्ये महाराष्ट्रातील केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली असून पर्यटनासाठी 99 कोेटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातील पहिला टप्पा हा विजयदुर्ग ते शिरोडा या सागरीकिनारपट्टीतील पर्यटन विकास करण्याचा आहे.