Mon, Apr 22, 2019 23:52होमपेज › Konkan › ‘पाणथळ’  सर्वेक्षणासाठी ‘सिंधुदुर्ग’ची निवड

‘पाणथळ’  सर्वेक्षणासाठी ‘सिंधुदुर्ग’ची निवड

Published On: Apr 24 2018 11:17PM | Last Updated: Apr 24 2018 11:12PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पाणथळ जागांचे संवर्धन महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात 64 पाणथळ जागा आहेत. या सर्व जागांचे ुशींश्ररपव ेष ारहरीरीहीींर या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार असून राज्यात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारचे सर्वेक्षण होत आहे. या अनुषंगाने येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात या मोबाईल अ‍ॅपच्या वापरासंदर्भात प्रशिक्षण घेण्यात आले. 

या प्रशिक्षणास अप्पर मुख्य सचिव (पर्यावरण) श्री. गवई, उपसचिव पर्यावरण श्री. पिंपळकर, अप्पर सचिव श्री. भालेराव, उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण महामंडळ रत्नागिरी श्री. आंधळे, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  या प्रशिक्षणामध्ये तलाठी, तहसीलदार व जिल्हाधिकारी पातळीवर मोबाईल अ‍ॅपमध्ये माहिती कशी भरावयाची, माहितीचा प्रकार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. याबाबत पाणथळ जागांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून अ‍ॅपमध्ये माहिती भरून तशी नोंद 7/12 उतार्‍यावर घेण्यात येणार आहे. या जिल्ह्यातील दलदल, तलाव, खाडी, तसेच इतर पाणथळ जागांची भौगोलिक रचनेनुसार माहिती संकलित होणार आहे.