Fri, Apr 26, 2019 19:21होमपेज › Konkan › छत्रपतींचा सामाजिक सलोख्यातून समृध्द सिंधुदुर्गचा संकल्प :  ना. दीपक केसरकर

छत्रपतींचा सामाजिक सलोख्यातून समृध्द सिंधुदुर्गचा संकल्प :  ना. दीपक केसरकर

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 11:01PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

छत्रपती शिवरायांच्या विचाराचा, पराक्रमाचा, समाज उत्कर्षाचा वाटचालीचा मागोवा घेत आपण दैनंदिन जीवनात वारसा जपूया. छत्रपती शिवरायांच्या सामाजिक सलोख्याचा आदर्श जोपासत विकासासाठी एकत्रित येवून समृध्द सिंधुदुर्ग बनविण्याचा आज आपण संकल्प करुया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

सिंधुदुर्गनगरी तिठ्यावर आयोजित शासकीय शिवजयंती कार्यक्रमात येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती अश्‍वारुढ पुतळ्यास पालकमंत्री केसरकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. अतिरिक्‍त जिल्हाधिकारी मंगेश जोशी,  अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, ओरोस सरपंच प्रीती देसाई, माजी सरपंच मंगला ओरोसकर, विविध समाज संघटनांचे पदाधिकारी व शासकीय कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करणारी जान्हवी सावंत, सुहास सावंत, नंदन वेंगुर्लेकर, रावजी यादव, मंगेश जोशी, दत्ताराम आणावकर यांची भाषणे झाली. उपस्थित सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

पंं. स.  सदस्या सुप्रिया वालावलकर, सर्फराज नाईक, रफिक खान शेख, आनंद मेस्त्री, छोटू पारकर, संतोष वालावलकर तसेच ओरोस ग्रामस्थ उपस्थित होते.  सूत्रसंचालन राम चव्हाण यांनी केले.