Mon, Mar 25, 2019 17:26होमपेज › Konkan › सिंधुदुर्गाने गाठला ४२ अंशाचा पारा

सिंधुदुर्गाने गाठला ४२ अंशाचा पारा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

रविवारी सकाळी 11 ते 4 या वेळेत सिंधुदुर्गवर अक्षरश: सूर्यनारायण कोपला की काय, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. कारण, सिंधुदुर्गचे तापमान जवळपास 42 अंश सेल्सिअसपर्यंत पेाहोचले होते. परिणामी, उन्हामुळे अक्षरश: अंगाची लाहीलाही होत होती. डांबरी रस्त्यावर तर वाहन चालविताना आगीतूनच आपण जात आहोत, असा अनुभव येत होता. 

एरव्ही सिंधुदुर्गचे तापमान हे 35 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत उन्हाळ्यात असते. मात्र, रविवारी अक्षरश: सूर्यनारायण आग ओकत होता. सकाळी 11 वा.पासूनच ही उन्हाची झळ जाणवू लागली. त्यानंतर अक्षरश: उन्हाच्या चटक्याने अंग भाजून निघत होते.

Tags : Sindhudurga, reach, 42 degree, mercury, Sindhudurg news


  •