Sun, Mar 24, 2019 06:38होमपेज › Konkan › सिंधुदुर्गनगरीत अंगणवाडी कर्मचार्‍यांचे जेलभरो

सिंधुदुर्गनगरीत अंगणवाडी कर्मचार्‍यांचे जेलभरो

Published On: Mar 16 2018 10:54PM | Last Updated: Mar 16 2018 10:23PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

अंगणवाडी कर्मचारी निवृत्तीच वय 60 वरुन पुन्हा 65 करा. ऑगस्ट 2017 पासून थकित राहिलेले पोषण आहार मानधन त्वरित द्या या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सभा संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी शुक्रवारी सिंधुदुर्गनगरीत जेलभरो आंदोलन छेडले. या आंदोलनात जिल्हाभरातील  शेकडो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.  पोलिसांनी आंदोलनात सहभागी  50 कर्मचार्‍यांना प्रतिकात्मक अटक करून ओरोस पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर त्यांची सुटका केली.

 शुक्रवारी सकाळी जिल्हाभरातील  अंगणवाडी कर्मचारी ओरोस रवळनाथ मंदिरामध्ये एकवटले. तेथे  प्रथम आंदोलकांची सभा झाली. यानंतर दु. 1 वा. सर्व आंदोलक कर्मचारी रवळनाथ मंदिर येथून महामार्गावर आले असता पोलिसांनी त्यांना अटक करीत पोलिस व्हॅनमध्ये घातले. यानंतर त्यांना ओरोस पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांची सुटका करण्यात आली.  अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य जनरल सेक्रेटरी कमल परुळेकर यांच्यासह संघटनेच्या नेत्या शालिनी तारकर, अलका बिर्जे, आरती कोरगांवकर आदी कर्मचार्‍यांचा यात सहभाग होता.यावेळी कर्मचार्‍यांनी ‘अंगणवाडी कर्मचारी सभेचा विजय असो’, ‘कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय सोडणार नाही’ अशा विविध घोषणा देण्यात परिसर दणाणून सोडला. जि. प. चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, महिला बाल कल्याण विभागाचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्या कारभारावर कमल परुळेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रति लाभार्थी पोषण आहार दर 15 रुपये करावा. अंगणवाड्यांचे समायोजन करताना कार्यरत कर्मचार्‍यांना कमी करू नये. राज्यात रिक्त असलेली प्रकल्प अधिकारी 352, मुख्य सेविका 717, अंगणवाडी सेविका 1620, मदतनीस 5172 ही पदे तात्काळ भरावीत.