Tue, Jul 23, 2019 16:52होमपेज › Konkan › हैद्राबाद येथे कोट्यातून सैन्य भरती मेळावा

हैद्राबाद येथे कोट्यातून सैन्य भरती मेळावा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

युध्द विधवा, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक तसेच सेवारत सैनिक यांचे पाल्य यांच्यासाठी सोल्जर जीडी, सोल्जर एसएचजीडी, सोल्जर क्लार्क/ एसकेटी, सोल्जर टेक्नीकल (रेजिंमेंट सर्व्हेअर) व सोल्जर ट्रेड्समॅन/हाऊस किपर या पदाकरिता आर्टीलरी सेंटर, हैद्राबाद येथे 4 ते 8 डिसेंबर  या कालावधीत युनिट हेडक्वार्टर्स कोटा सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी असल्ट ग्राऊंड, 1 ट्रेनिंग  रेजिमेंट जवळ, आर्टीलरी सेंटर, हैद्राबाद येथे भरतीच्या दिवशी सकाळी 5.30 वा. हजर रहावयाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  इच्छूक उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष संपर्क साधावा.