सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी
केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली देशभरातील डॉक्टरांनी एल्गार पुकारला आहे. सरकारचा विरोध करण्यासाठी सर्व डॉक्टर 2 जानेवारी रोजी काळा दिवस पाळत सकाळी 6 ते सायंकाळी 6 या 12 तासांचा संप केला. याबाबतचे निवेदन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, शासनाने मागणीकडे लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशाराही सिंधुदुर्ग जिल्हा मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उबाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या मुद्द्यावरून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच डॉक्टर विरुद्ध केंद्र सरकार, असा संघर्ष पेटणार आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा मसुदा देशभरातील डॉक्टरांना मान्य नाही. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने मंगळवारी सकाळी 6 ते सायंकाळी 6 हा 12 तासांच्या संपाची हाक दिली होती. दवाखाने बंद; आपत्कालीन सेवा सुरू...