Wed, Jun 26, 2019 11:57होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग सलग आठव्यांदा राज्यात नं.१

सिंधुदुर्ग सलग आठव्यांदा राज्यात नं.१

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 08 2018 10:13PMकणकवली : वार्ताहर

माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात सलग आठव्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वाधिक 97.04 टक्के निकाल लागला आहे. तर कोकण बोर्ड सलग सातव्या वर्षी 96 टक्के निकालासह राज्यात अव्वल ठरले आहे. सिंधुदुर्गातील 105 विद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. सिंधुदुर्गात डॉन बॉस्को ओरोसची जान्हवी विष्णू लाड व जयगणेश स्कूल मालवणचा आशिष अविनाश झांट्ये यांनी 100 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

सिंधुदुर्गात एस. एम. हायस्कूल कणकवलीची सानिका संदीप सावंत हिने 99.80 टक्के, सेंट ऊर्सुला स्कूल वरवडेची तनिष्का दामोदर खानोलकर, टोपीवाला हायस्कूल मालवणची एकता दत्तप्रसाद खानोलकर  हिने 99.40 टक्के, विद्यामंदिर कणकवलीचा श्रेयस शत्रृघ्न दळवी व डॉन बॉस्को ओरोसची साक्षी सुनील नाईक यांनी 99 टक्के, तर आरपीडी सावंतवाडीची साक्षी ठाकूर, शेठ म. गो. हायस्कूल देवगडचा सौरभ महेश कानेटकर, पणदूर हायस्कूलची सायली सखाराम सावंत हिने 98.20 टक्के गुण मिळविले आहेत.  

सिंधुदुर्गातून दहावी परीक्षेसाठी 12 हजार 91 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 12 हजार 87 विद्यार्थी परीक्षेस बसले  होते. त्यातील 11 हजार 729 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये 4 हजार 262 विद्यार्थी विशेष श्रेणीत, 4 हजार 564 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 2 हजार 447 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर 456 विद्यार्थी पास झाले आहेत. 

कोकण बोर्ड आणि सिंधुदुुर्ग जिल्ह्याने गेल्या सहा वषार्ंपासून राज्यात सर्वाधिक निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. कोकण बोर्ड व सिंधुदुर्ग राज्यात अव्वल ठरले असताना रत्नागिरी जिल्ह्यानेही 95.51 टक्के निकालासह राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. कोकण बोर्डातून नोंदणी केलेल्या 37 हजार 706 विद्यार्थ्यांमधून 37 हजार679 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 36 हजार 171  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 10 हजार 377 विद्यार्थी विशेष श्रेणीत, 14 हजार 208 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 9 हजार 437 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 2 हजार 149 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर राज्यात कोल्हापूर बोर्डाने दुसरे तर  पुणे बोर्डाने तीसरे स्थान मिळविले आहे. 

सावंतवाडी तालुक्याचा सर्वाधिक निकाल

दहावीचा परीक्षेचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल सर्वाधिक 97.88 टक्के लागला आहे. त्या खालोखाल वेंगुर्ले तालुक्याचा निकाल 97.77 टक्के, कणकवली तालुक्याचा निकाल 97.52 टक्के, वैभववाडी तालुक्याचा निकाल 97.46 टक्के, दोडामार्ग तालुक्याचा निकाल 97.23 टक्के, मालवण तालुक्याचा निकाल 96.86 टक्के, कुडाळ तालुक्याचा निकाल 96.51 टक्के, देवगड तालुक्याचा निकाल 95.72टक्के लागला आहे. 

पुनर्पर्रीक्षार्थीचा निकाल 54.57 टक्के

सिंधुुदुर्गचा पुनर्परीक्षार्थींचा निकाल 57.57 टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेल्या 317 विद्यार्थ्यां पैकी 173 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. त्यापैकी 3 जण विशेष श्रेणीत, 5 प्रथम श्रेणीत, 43 द्वितीय श्रेणीत आणि 122 पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्पक्षार्थींचा रत्नागिरीचा निकाल 45.75 टक्के लागला आहे. कोकण बोर्डाचा निकाल 48.15 टक्के  लागला आहे. 

कोकण बोर्डात 1649  विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक  गुण कोकण बोर्डात 1649 विद्यार्थ्यांनी 90 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. 85 ते 90 टक्क्यांपर्यंत 2138 विद्यार्थी, 80 ते 85 टक्क्यांपर्यंत 2948 विद्यार्थी, 75 ते 80 टक्क्यांपर्यंत 3656 विद्यार्थी, 70 ते 75 टक्क्यांपर्यंत 4403 विद्यार्थी, 65 ते 70 टक्क्यांपर्यंत 4753 विद्यार्थी, 60 ते 65 टक्क्यांपर्यंत 5077 विद्यार्थी आणि 45 ते 60 टक्क्यांपर्यंत 9540 विद्यार्थी तर 45 टक्क्यांहून खाली 2568 विद्यार्थी आहेत. 

नेहमीप्रमाणे निकालात मुलींचीच बाजी

दहावीच्या निकालात मुलींनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुलांच्या तुलनेत बाजी मारली आहे. मुलांचा निकाल 96.52 टक्के तर मुलींचा निकाल 97.62 टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेल्या 6379 मुलांपैकी 6157 मुलगे उत्तीर्ण झाले आहेत तर 5708  मुलींपैकी 5572 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. कोकण बोर्डातही मुलींनीच नेत्रदीपक यश मिळवले आहे. तसेच राज्याच्या निकालातही दरवर्षीप्रमाणे मुलीच अग्रेसर ठरल्या आहेत.