Mon, Aug 26, 2019 00:12होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : आचरा- टेंबली येथे सापडले प्राचीन कोरीव शिल्प

सिंधुदुर्ग : आचरा- टेंबली येथे सापडले प्राचीन कोरीव शिल्प

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:28PM

बुकमार्क करा

आचरा : वार्ताहर

आचरा टेंबली येथे एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना चौकोनी आकाराच्या दगडावर कोरलेले रेखीव शिल्प सापडले आहे. चौकोनी आकाराच्या दगडावर दोन स्त्रीया पिंडी घेऊन बसल्याचे चित्र कोरण्यात आले आहे. खोदलेली माती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला टाकताना मातीत ठेकेदाराला चौकोनी आकाराचा दगड सापडला होता. शिल्प सापडल्याची चर्चा आचरा परिसरात सोशल मिडीयावर रंगली होती. 

आचरा- टेंबली येथे एका घराच्या बांधकामासाठी जागेचे सपाटीकरण करताना खडकाळ भाग खोदून माती व दगड बाजूला टाकताना हे कोरीव शिल्प सापडले आहे. एका ठेकेदाराच्या मार्गदर्शनाखाली  काम चालू होते. सपाटीकरण करताना काढलेली माती, दगड  जेसीबीच्या सहाय्याने बाजूला टाकली जात होती. 

त्यावेळी त्या मातीत चौकोनी आकाराचा दगड ठेकेदारास दिसून आला असता कुतुहलापोटी ठेकेदाराने  तो दगड बाजूला काढून घेत मातीने भरलेला तो दगड साफ करण्यास सुरूवात केली असता त्यावर कोरीव काम केले असल्याचे त्याला आढळून आले. त्याने तो दगड कामगाराच्या सहाय्याने बाजूला काढून साफ केला असता त्यावर कोरीव काम केले असल्याचे आढळून आले. शिल्प मिळाल्याची बातमी  परिसरात सोशल मिडीयावर पसरताच नागरिकांनी ते शिल्प बघण्यासाठी धाव घेतली होती.