Thu, Dec 12, 2019 08:09होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : तीन लाखांची दारू जप्त; चौघांना अटक

सिंधुदुर्ग : तीन लाखांची दारू जप्त; चौघांना अटक

Published On: May 04 2018 10:35PM | Last Updated: May 04 2018 10:03PMकणकवली : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी नेमलेल्या विशेष पोलिस पथकाने गुरुवारी सायंकाळी आणि शुक्रवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव पुलाजवळ आणि वागदे पुलाजवळ सापळा रचून दोन कारसह सुमारे पावणेतीन लाखांची गोवा बनावट दारू जप्त केली. 

याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.  पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास महामार्गावर नांदगाव पूलाजवळ विशेष पोलिस पथकाने सापळा रचला. यावेळी इर्टिका कारमधून वाहतूक होत असलेली 1 लाख 5हजार 810 रू. किंमतीची गोवा बनावटीची विविध प्रकारची दारू जप्त केली. तसेच 8 लाखाची इर्टिका कारही ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी कारचालक धिरज सुरज भिसे (38, बांदा) व त्याच्यासोबत असलेला जसराज रत्नकांत नार्वेकर (23, बांदा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. बिगर परवाना, गैरकायदा दारूची वाहतूक करताना आढळून आल्याप्रकरणी त्यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबबातची फिर्याद पांडुरंग पांढरे यांनी दिली. 

तर शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर वागदे पुलाजवळ पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सापळा रचून कारमधून वाहतूक होत असलेली 1 लाख 75 हजार 200 रू. किंमतीची गोवा बनावट दारू जप्त केली. तसेच सव्वाआठ लाखाची कारही ताब्यात घेण्यात आली. या कारचा चालक अभय दिनेश मयेकर (पिंगुळी) व त्याच्यासोबत असलेला शिवकुमार छदीलाल सरोज (32, झाराप, मूळ उत्तरप्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली. याबाबतची फिर्यादही पोलिसनाईक पांडुरंग पांढरे यांनी दिली. वरील दोन्ही कारवाई पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक एस.बी. मुल्ला,  पोलिसनाईक पांडुरंग पांढरे, डॉमनिक डिसोजा, सावळ यांनी केली.