Tue, Jul 16, 2019 01:36होमपेज › Konkan › ग्रामसेभेची मागणी नसतानाही  कामावर ७१ हजार रुपये खर्च

ग्रामसेभेची मागणी नसतानाही  कामावर ७१ हजार रुपये खर्च

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 8:57PM

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी  

प्राशासक असलेल्या नांदरुख ग्रामपंचायतच्या प्रशासक व ग्रामसेवक यांनी ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत मासिक सभेची मागणी नसताना एका कामावर 71 हजार रुपये निधी खर्च केला आहे. हा प्रकार शुक्रवारी झालेल्या तहकूब ग्रामसभेत उघड झाला. याबाबत चौकशी करावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. नांदरुख ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा समीर पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. यावेळी ज्या कामावर प्रशासक व ग्रामसेवक यांनी 71 हजार रुपये खर्च केला त्याची मागणी मागितली. मात्र, ही मागणी नसल्याचे यावेळी सिद्ध झाले.

तसेच त्यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त पूर्ण न केल्याचेही उघड झाले. ग्रामपंचायत निधीचा गैरवापर, इतिवृत्त रजिस्टरमध्ये खाडाखोड, हेतुपुरस्कार ठेवलेल्या मोकळ्या जागा यामुळे ग्रामसभेने इतिवृत्त रजिस्टर पंचाच्या स्वाक्षरीने सील केले.  या प्रकरणाची तत्काळ चौकशी व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.   समीर पाटकर, नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच दिनेश चव्हाण, विकी चव्हाण, सुहास राणे उपस्थित होते.