Mon, Sep 24, 2018 05:59होमपेज › Konkan › स्थायी समिती सभेतही पडसाद

स्थायी समिती सभेतही पडसाद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी ; प्रतिनिधी 

आरोग्य सेवेसाठी दोडामार्ग येथे सुरू झालेल्या जनआक्रोश आंदोलनाचा विषय मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत जोरदार गाजला. या आंदोलनास स्थायी समितीचा पूर्णपणे पाठिंबा असून जनतेच्या आरोग्याचा प्रश्‍न सुटणे महत्त्वाचा आहे, अशी भूमिका सभेत मांडतानाच आरोग्यासारखा महत्त्वाचा विषय समोर असताना जिल्ह्याचे सुपुत्र व आरोग्यमंत्री तसेच पालकमंत्री यांना त्यांचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचा सुरही या सभेत उमटला. जि. प. स्थायी समिती सभा अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील झाली. 


  •