Thu, Jun 27, 2019 02:05होमपेज › Konkan › १७ कोटी रु. पाणीपट्टी, घरपट्टी वसूल

१७ कोटी रु. पाणीपट्टी, घरपट्टी वसूल

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 09 2018 9:35PM

बुकमार्क करा
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींना सन 2017-18 साठी देण्यात आलेल्या 19 कोटी 44 लाख 85 हजार रुपये घरपट्टीच्या उद्दिष्टापैकी 12 कोटी 90 लाख 31 हजार रुपयांची वसुली तर पाणीपट्टीच्या 6 कोटी 46 लाख 5 हजार रुपयांच्या उद्दिष्टापैकी 4 कोटी 41 लाख 40 हजार रुपयांची वसुली झाली आहे. जिल्ह्याच्या एकूण 25 कोटी 90 लाख 90 हजार रुपयांच्या घरपट्टी व पाणीपट्टी पैकी 17 कोटी 31 लाख 71 हजार रुपयांची आतापर्यंत वसुली झाली आहे. यात घरपट्टी वसुलीत देवगड तालुका तर पाणीपट्टी वसुलीत वेंगुर्ले तालुका आघाडीवर  आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील 429 ग्रामपंचायतींना दरवर्षी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात येते. या उद्दिष्टानुसार संबंधित ग्रा.पं. व तालुक्यांकडून वसुली केली जाते. सन 2017-18 साठी जिल्ह्याला 19 कोटी 44 लाख 85 हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पैकी आतापर्यंत 66 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. यात देवगड तालुका आघाडीवर आहे. तसेच पाणीपट्टीसाठी 6 कोटी 46 लाख 5 हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात  आले होते. पैकी 68 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. यात वेंगुर्ले तालुका आघाडीवर आहे. 

12 कोटी 90 लाख 31 हजारांची वसुली  आठ तालुक्यांना देण्यात आलेल्या 19 कोटी 44 लाख 85 हजार रुपयांच्या घरपट्टी वसुली उद्दिष्टापैकी 12 कोटी 90 लाख  31 हजार रुपयांची घरपट्टी वसूल झाली आहे. तर 6 कोटी 54 लाख 54 हजार रुपयांची घरपट्टी वसुली शिल्लक आहे. यात कुडाळ तालुका उद्दिष्ट- 3 कोटी 34 लाख 42 हजार रुपये, वसुली- 2 कोटी 32 लाख 94 हजार रुपये, कणकवली- 4 कोटी 18 लाख 36 हजार उद्दिष्टापैकी 2 कोटी 74 लाख 47 हजार रुपयांची वसुली, मालवण- 2 कोटी 49 लाख 16 हजार रुपये उद्दिष्टापैकी 1 कोटी 70 लाख 49 हजार रुपयांची वसुली  झाली.