Wed, Jul 17, 2019 10:43होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे पुरस्कार जाहीर

Published On: Aug 16 2018 10:51PM | Last Updated: Aug 16 2018 10:51PMओरोस : प्रतिनिधी

सहकारी क्षेत्रात  उत्कृष्ट काम करणार्‍या संस्था, संस्था पदाधिकारी, शेतकरी यांना जिल्हा बँकेच्यावतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळा ओरोस शरद कृषी भवन येथे 31 ऑगस्ट रोजी राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक को. ऑप. बँक फेडरशेनचे अध्यक्ष आणि नॅफकब चे राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्याधर अणासकर यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या संस्था, सहकारी संस्था, पदाधिकारी, सहकारातील कर्मचारी, शेतकरी यांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी पुरस्कार देते. या वर्षी पुरस्कार निवडीसाठी डॉ. प्रसाद देवधर, पत्रकार विजय शेट्टी, संदीप राणे, श्री. गाडगीळ यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने प्राप्त प्रस्तावांची पाहणी करून पुरस्कारांची निवड केली आहे. 

त्यानुसार स्व. बाळासाहेब सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणार्‍या जीवनगौरव पुरस्कार पुष्पसेन भिकाजी सावंत (डिगस), कै. शिवराम भाऊ जाधव स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा उत्कृ ष्ट सहकारी संस्था पुरस्कार गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मालवण, कै. डि. बी. ढोलम स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट सहकारी संस्था कर्मचारी पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मायमिक व उच्च मायमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था ओरोसचे सचिव प्रदीप लक्ष्मण देसाई यांना कै. केशवराव राणे स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार सहकारी कौल उत्पादक संस्था नेमळेचे अध्यक्ष आत्माराम भिकाजी राऊळ यांना तर  कै. भाईसाहेब सावंत स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा कृषिमित्र पुरस्कार रानबांबुळी येथील दत्ताराम लक्ष्मण खोत यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सतीश सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.