होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग बँक राष्ट्रीय स्तरावर नावारूपास येईल : अडसूळ

सिंधुदुर्ग बँक राष्ट्रीय स्तरावर नावारूपास येईल : अडसूळ

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 11:05PM

बुकमार्क करा
ओरोस : प्रतिनिधी

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या स्पर्धेत सिंधुदुर्ग बँक ही राज्यातील एक अग्रगण्य  बँक आहे.  एटीएम सेवा, सर्व शाखांचे संगणकीकरण आणि  शून्य एनपीए असलेली ही बँक राज्यातच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही नावारूपास येईल, असा विश्‍वास एम्प्लॉईज बँक युनियनचे संस्थापक अध्यक्ष खा. आनंदराव अडसूळ यांनी  व्यक्‍त केले. सिंधुदुर्गनगरी शरद कृषी भवन येथे को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने  सिंधुदुर्ग बँक युनिट कर्मचार्‍यांचा वेतन करार करण्याच्या हेतून एकता मेळावा आयोजित केला होता.  याचे  उद्घाटन  खा. आनंदराव अडसूळ व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते झाले. खा. अडसूळ  म्हणाले, जिल्हा बँक ही अग्रगण्य  बँकेप्रमाणे काम करीत आहे. महाराष्ट्रात सहकार जोमाने  वाढत आहे.  ज्याची पत नाही, त्याची पत निर्माण  करण्याचे काम जिल्हा बँकेने केले आहे. या जिल्हा बँकेला भाई मेहता व अन्य पुरस्कार मिळाले आहेत. यातूनच  बँकेचे दर्जात्मक  कामकाज स्पष्ट होत आहे.