Fri, Apr 19, 2019 11:57होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : 88 कोटींच्या आनंदवाडी योजनेला मान्यता

सिंधुदुर्ग : 88 कोटींच्या आनंदवाडी योजनेला मान्यता

Published On: May 04 2018 10:35PM | Last Updated: May 04 2018 10:09PMमुंबई :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी येथे 88 कोटी 44 लाख रुपये खर्च करून मस्त्यबंदर उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 25 कोटी रुपये केंद्र सरकार देणार असून 63 कोटी 44 लाख रुपये राज्य सरकारला द्यावे लागणार आहेत. 

देवगड तालुक्यात हे गाव असून तेथे 2005 साली आनंदवाडीसह राज्यातील आठ बंदरांच्या विकासाला मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी 29 कोटी 13 लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर याच बंदराच्या 35कोटी 89 लाख रूपयांच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

या बंदराचे काम सुरू होताच स्थानिक ग्रामस्थांनी बंदराच्या आराखड्याला विरोध करून काम बंद पाडले.  या बंदराच्या विकास आराखड्याला ग्रामस्थांचा विरोध होता. त्यामुळे सुधारित विकास आराखडा  तयार करून त्याला पुन्हा प्रशासकीय मान्यता देण्याची गरज होती. त्यानुसार हा आराखडा तयार करण्यात  आला आहे. त्याला मान्यता देण्यात आली.त्यानुसार हा आराखडा 88 कोटी 44 लाख रूपयांचा आहे.