Tue, Jul 23, 2019 06:34होमपेज › Konkan › अजित सावंत यांना जिल्हा पत्रकार संघाचा ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार

अजित सावंत यांना जिल्हा पत्रकार संघाचा ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 02 2018 10:26PM

बुकमार्क करा
सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना प्रेरणा देणार्‍या जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन नाईक यांनी केली.  दै. पुढारीचे कणकवली येथील मुख्य प्रतिनिधी अजित सावंत यांना ‘उत्कृष्ठ पत्रकार’ पुरस्कार,  जिल्हा मुख्यालयातील पत्रकार देवयानी वरसकर यांना ‘वरीष्ठ पत्रकार’ सावंतवाडी येथील पत्रकार संतोष सावंत यांना आदर्श पत्रकार,तर शोध पत्रकारिता पुरस्कार पत्रकार महेश सरनाईक यांना जाहीर करण्यात आला आहे. 6 जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे होणार्‍या पत्रकार दिनाच्या सोहळयात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे .   

 जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा पत्रकार निवड समितीचे अध्यक्ष गजानन नाईक, पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे,  जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत,  जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, मागील वर्षांचे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार प्रमोद ठाकूर आदींच्या उपस्थितितिल या निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली. या नंतर  गजानन नाईक यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक करंबेळकर, नंदकिशोर महाजन आदी उपस्थित होते.

जिल्हा पत्रकार संघाने आणखी दोन पत्रकारांना विशेष गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत.पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान असलेले तुकाराम नाईक आणि पत्रकार संघाच्या सुरुवातीच्या काळापासून योगदान असलेले मोहन जाधव यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.  पत्रकार अजित सावंत हे गेली अठरा-एकोणीस वर्षे पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या ‘पुढारीकार’ पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. पुरस्कार प्राप्त पत्रकारांना 6 जानेवारी रोजी पुरस्कार देवून गौरविले जाणार आहे. या वर्षी 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री  जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाच्या भुमीपूजनाचा कार्यक्रम होणार होता मात्र या कामाच्या निविदा प्रक्रिया आणि कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने भूमिपूजनाचा कार्यक्रम आता फेब्रुवारी महिन्यात केला जाईल असेही यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन नाईक यांनी सांगितले.