Sun, Jan 20, 2019 09:21होमपेज › Konkan › सिंधुदर्ग : आगीत पाच हजार काजू कलमे खाक

सिंधुदर्ग : आगीत पाच हजार काजू कलमे खाक

Published On: Feb 15 2018 10:30PM | Last Updated: Feb 15 2018 10:08PMदोडामार्ग : प्रतिनिधी

पडवे-माजगाव येथे दोडामार्ग - बांदा मार्गानजीक असलेल्या 25 एकर क्षेत्रावरील काजू बागेला आग लागून सुमारे पाच हजार काजू कलमे जळून खाक झाली. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी भर दुपारी 12 वा. सुमारास घडली. या अग्‍नितांडवामुळे  मार्गावर दाट धूर पसरल्याने दोन्ही बाजूंनी वाहने अडकून पडली होती.

पडवे-माजगाव येथील स्थानिक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात काजू बागायती केल्या आहेत. आता काजू हंगामास प्रारंभ झाला आहे. गुरुवारी दुपारी या बागायत परिसरात अचानक आग लागली. वाळलेले गवत, पालपाचोळा, वारा व दुपारची वेळ यामुळे काही क्षणांतच आगीने संपूर्ण बागायत कवेत घेतली. आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर मोरगाव आणि पडवे-माजगाव येथील शेकडो ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीचा भडका उडाल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न तोकडे पडले.